ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली.
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी गांधीजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा. राजेंद्र गायकवाड, प्रिन्सिपल अल्ताफ खान, अमोल आहेर, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, पारस भगत, अजीम पटेल , राजेश कांबळे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत , नीलिमा देशमुख, सुनिता वडे, आदीसह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक अझहर खतीब यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!