ताज्या घडामोडी

पोलीसातला देव माणुस विजय राजाराम सोणार पो.निरीक्षक दहीसर पोलीस ठाणे यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विषेश उपक्रम….

पोलीसातला देव माणुस विजय राजाराम सोणार दहीसर पोलीस ठाणे यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विषेश उपक्रम….
जय हिंद,
आज दिनांक 30/01/2024 रोजी सकाळी. 11/00 ते 12/00 वा. चे दरम्यान वाहतूक सुरक्षा महिन्याच्या अनुषंगाने चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व घोषवाक्य या स्पर्धेचे आयोजन राजश्री हॉल मराठा कॉलनी रोड दहिसर, पूर्व, मुंबई या ठिकाणी करण्यात आले होते.
सदरवेळी
1) विद्यामंदिर हायस्कूल मराठी माध्यम
2) स्वामी विवेकानंद हायस्कूल मराठी माध्यम
3) तांबे एज्युकेशन मराठी माध्यम
4) विद्याभूषण हायस्कूल मराठी माध्यम
5) विद्यामंदिर हायस्कूल इंग्रजी माध्यम
6) पूर्ण प्रज्ञा हायस्कूल इंग्रजी माध्यम
7) संजीवनी हायस्कूल इंग्रजी माध्यम
8) स्वामी विवेकानंद हायस्कूल इंग्रजी माध्यम
9) मातृछाया हायस्कूल इंग्रजी माध्यम
10) सेंट झेवियर हायस्कूल इंग्रजी माध्यम
आशा वरील 10 शाळांनी सहभाग नोंदविला होता . सदरवेळी शाळेतील ३०० मुले, त्यांचे शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते.
सर्व परीक्षा एकाच वेळी वेगवेगळ्या हॉलमध्ये ११.०० वा. ते १२.०० वा. चे दरम्यान घेण्यात आलेल्या होत्या.
सर्व स्पर्धा परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक यांना अल्पोपहारचे वाटप करण्यात आले.
स्पर्धा परीक्षा संपल्यानंतर शिक्षक व पालक यांनी सदरच्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी भरवल्या बाबत मुंबई पोलिसांचे आभार मानले.
सदर वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
आदरपूर्वक
विजय सोनार
प्रभारी पोलीस निरीक्षक
दहिसर वाहतूक विभाग

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!