ताज्या घडामोडी

कोल्हापूर मध्ये छत्रपती शिवाजी पेठेत भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी निमित्त रिक्षा सौंदर्य राज्यस्तरीय स्पर्धा सन 2024 पार पडली

कोल्हापूर मध्ये छत्रपती शिवाजी पेठेत भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी निमित्त रिक्षा सौंदर्य राज्यस्तरीय स्पर्धा सन 2024 पार पडली

प्रतिनिधी : सागर चौगुले कोल्हापूर शहर

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा चालक सेना व निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळ कोल्हापूर यांनी आज भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी निमित्य रिक्षा सौंदर्य राज्यस्तरीय स्पर्धा सन 2024 महाराष्ट्र रिक्षासुंदरी आणि कोल्हापूर रिक्षासुंदरी अशी स्पर्धा पार पडली श्रीयुत राजेंद्र शंकरराव जाधव जिल्हाप्रमुख महाराष्ट्र रिक्षा चालक सेना यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कोल्हापूर शिवसेना संपर्कप्रमुख मा.विजय देवणे , पुणे येथील रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष मा.बाबा कांबळे , मा.गफार नदाफ, शिवसेना शहर प्रमुख मा.रविकिरण इंगवले,माजी नगरसेवक मा.दत्ता टिपूगडे , मा.सुनील मगदूम आजरा अर्बन बँक संचालक, मा.किरण पडवळ, मा.दीपक कस्तुरे, मा.मोहन बागडी , या सर्व मान्यवरांच्या उपस्थित ही स्पर्धा पार पडली
स्पर्धेत कोल्हापूर, गडहिंग्लज, रत्नागिरी,कर्नाटक,पुणे येथील स्पर्धाकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता स्पर्धातसेच अ गटसन 2020 ते 2024 या वर्षामधील रिक्षा व ब गट 2020 च्या आतील सर्व जुन्या रिक्षाअशा दोन गटात पार पडली रिक्षाचे सौंदर्य पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी कार्यक्रमास्थळी भेट देऊन प्रत्येक रिक्षाच्या सौंदर्याचा आणि त्यांच्या रुबाबाचा आस्वाद घेतला, रिक्षा इतक्या सुंदर असू शकतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज सर्व रिक्षा प्रेमींना भेटला नवीन तीन लाखाची रिक्षा घेऊन तिच्यावर पाच लाख खर्च करणारे हौशी कलाकार देखील दिसले तसेच जुन्या सुरुवातीला चालू झालेल्या रिक्षाच्या मॉडेल अजून जपासुन पठेवलेल्या जुन्या रिक्षा ही तेथ सौंदर्य स्पर्धेत बघायला भेटल्या
अ गट
प्रथम क्रमांक MH 09 EL 1776 , अल्ताफ कमरूद्दीन शेख , कोल्हापूर

द्वितीय क्रमांक MH 08 AQ 3811 संकल्प शिंदे रत्नागिरी

तृतीय क्रमांक MH 12 QE 4870 अनिकेत पाटील पुणे

उत्तेजनार्थ KA 22 C 7720 तवरेज बसापुरे बेळगाव

ब गट
प्रथम क्रमांक MH 09 EL 5000 इनुस मुनेर कोल्हापूर

द्वितीय क्रमांक MH 09 EL 2725 अविनाश दिंडे कोल्हापूर

तृतीय क्रमांक MH 08 AQ 7250 शुभम नरवणकर रत्नागिरी खोपोली

उत्तेजनार्थ mh 09 EL 5013 तानाजी देवाडे गडिंग्लज

महाराष्ट्र सुंदरी हा मान कोल्हापुरातील mh 09 EL 5000

कोल्हापूर सुंदरी हा मान MH 09 EL 1776

या रिक्षास भेटला

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!