ताज्या घडामोडी

तपास; ८ तासात चोरट्यांचा शोध

स्कॉटलँड पोलिसांपेक्षाही येवला शहर पोलिसांचा तेज तपास;
८ तासात चोरट्यांचा शोध

बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला शहरातील नगर मनमाड महामार्ग लगत दराडे पेट्रोलियम जवळ पत्रकार सुदर्शन खिल्लारे यांच्या मालकीचे एस एस मोबाईल शोरूम असून या ठिकाणी टीव्ही विक्री देखील केली जाते
दिनांक 23 जानेवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघा अज्ञात चोरट्यांनी शोरूमच्या बाहेर डिस्प्ले साठी ठेवलेले टीव्ही संच मॅनेजरची नजर चुकून उचलून नेला होता
दरम्यान दुसऱ्या दिवशी ऑडिटमध्ये सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर सीसीटीव्ही मध्ये सदरचे चोरटे चोरी करत असताना निदर्शनास आले ही बाब तात्काळ येवला शहर पोलिसांना कळतच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक तपास करून अवघ्या आठ तासांच्या आत येवला शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुख्य आरोपी श्याम कृष्णा विधाते व त्याचा साथीदार गणेश शिंदे या दोघांना अटक केली दरम्यान या दोघात चोरट्यांनी येवला शहर परिसरात आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का याचा आता येवला शहर पोलीस तपास करत असून येवला शहरात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई बाबा पवार व पोलीस शिपाई गणेश पवार आदींनी ही कामगिरी केली आहे
त्यांच्या या कामगिरीचं कौतुक होत असून येवला शहरातील इतरही चोरांचा तपास जलद गतीने व्हावा अशी अपेक्षा आता येवलेकर करत आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!