ताज्या घडामोडी

५१वे येवला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात उत्साहात संपन्न… अंदरसुल- पंचायत समिती (शिक्षण विभाग) येवला, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुल व तालुका विज्ञान अध्यापक संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५१ वे तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १ जानेवारी व २ जानेवारी २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाले.

५१वे येवला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई
गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात उत्साहात संपन्न…
अंदरसुल- पंचायत समिती (शिक्षण विभाग) येवला, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुल व तालुका विज्ञान अध्यापक संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५१ वे तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १ जानेवारी व २ जानेवारी २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात १ली ते ५ वी या प्राथमिक गटात ७१, ६ वी ते ८ वी या उच्च प्राथमिक गटात ८३ (दिव्यांग १), ९ वी ते १२ वी या माध्यमिक गटात ५५ (दिव्यांग १) असे एकुण २११ शाळांनी विद्यार्थी प्रतिकृती मध्ये सहभाग नोंदविला.
तसेच शिक्षक शैक्षणिक प्रतिकृती इ.६वी ते ८वी या प्राथमिक शिक्षक गटात २०, इ.९वी ते १२वी या माध्यमिक शिक्षक गटात ७, प्रयोगशाळा परिचर या गटात १० असे एकुण ३७ शिक्षकांनी आपला सहभाग नोंदविला.
दिनांक १ जानेवारी रोजी उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री.अरुण भांडगे यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे उदघाटन श्री.अंबादासजी बनकर (मा.चेअरमन,एन.डी.सी.सी.बँक नाशिक), श्री.अमोल सुभाष सोनवणे (सरचिटणीस,अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ) व श्री.किसन काका धनगे (सभापती,कृ.उ.बा.समिती येवला), श्री.हर्षवर्धन बहिर (पी.एस.आय. येवला ग्रामीण पोलीस स्टेशन), ब्रम्हाकुमारी नितादीदी, ब्रम्हाकुमारी अनुदिदी (ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र येवला), सौ.अश्विनी खैरनार (सरपंच ग्रा.पा.अंदरसुल), संचालक श्री.जीवनसेठ गाड़े, श्री.उज्ज्वल जाधव, श्री.संजय ढोले (उपसरपंच, ग्रा.पा.अंदरसुल), येवला ता. इंग्लिश मि. संस्थाचालक संघटनेचे श्री. प्रविण बनकर, श्री.खुशाल गायकवाड, श्री.योगेश सोमवंशी, श्री.राम जाधव, श्री.काकासाहेब कदम, श्री.अशोक एंडाईत, श्री.अतुल गाड़े, श्री.बाबासाहेब बेरगळ तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांनी केले.
दिनांक २ जानेवारी रोजी पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.आमदार श्री.नरेंद्र दराडे (विधान परिषद सदस्य) यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.दिलीप (आण्णा) खैरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस), मा.श्री.बाळासाहेब करडक, मा.श्री.बाळासाहेब लोखंडे (स्विय सहाय्यक, संपर्क कार्यालय येवला), मा.श्री.लोंढे नाना (स्विय सहाय्यक, संपर्क कार्यालय येवला), श्री.सुमित थोरात (संचालक,खरीदी विक्री संघ येवला), श्री.सुभाष गांगुर्डे (संचालक,मर्चेंट बँक येवला), श्री.सुनिल पैठणकर (युवा नेते), गटशिक्षणाधिकारी श्री.संजय कुसाळकर, विस्तार अधिकारी श्री.सुनिल मारवाडी, अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री.अरुण भांडगे (अध्यक्ष), श्री.सुदाम सोनवणे (उपाध्यक्ष), श्री.मकरंद सोनवणे(खजिनदार), श्री.राजेंद्र गायकवाड (संचालक व प्रशासकीय अधिकार), श्री.मयुर सुभाष सोनवणे (सहचिटणीस,अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ), सौ.विनिता अमोल सोनवणे (मा.सरपंच, अंदरसुल), श्री.सचिन बागुल, श्री.संदिप वाकचौरे, श्री.रामनाथ काका एंडाईत, श्री.भागीनाथ थोरात, श्री.द्वारकानाथ सोनवणे, श्री.पुंडलिक जानराव, श्री.रविंद्र थळकर (अध्यक्ष, ये.ता.वि.अ.सं.), श्री.चंद्रशेखर दंडगव्हाळ (उपाध्यक्ष, ये.ता.वि.अ.सं.), श्री.क्षितीज नाकिल (कोषाध्यक्ष), श्री.रामदास भवर (जिल्हा प्रतिनिधि), श्री.सुधीर आहेर (जिल्हा प्रतिनिधि), प्रतिकृति निरीक्षण अध्यक्ष श्री.शिवाजी पाटिल व इतर उपस्थित मान्यवरांच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
*तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात १ ली ते ५ वी प्राथमिक गटात विद्यार्थी प्रतिकृती मध्ये प्रथम क्रमांक -चैतन्य दराडे, रूद्र भाबडे जनता विद्यालय मुखेड, द्वितीय क्रमांक -उमेर शेख, अरशन शेख स्वामी विवेकानंद विद्यालय एरंडगाव, तृतीय क्रमांक- साजन राठोड, अमोलचव्हाण आश्रम शाळा राजापूर यांनी मिळविला.
*उच्च प्राथमिक ६ वी ते ८ वी गटात विद्यार्थी प्रतिकृती मध्ये प्रथम क्रमांक- प्राची वाघ, सागर राउत आत्मा मलिक पुरणगाव, द्वितीय क्रमांक- विश्वदीप मेहते, सार्थक जाधव जि प शाळा चिचोंडी, तृतीय क्रमांक- पलक छटाणी, अश्मिरा शेख स्वामी मुक्तानंद इं मिडीयम येवला यांनी मिळविला.
*माध्यमिक गट ९ वी ते १२ वी या विद्यार्थी प्रतिकृती प्रथम क्रमांक- ओमकार मोरे, तनूजा भुजबळ एस.एस.एम.व्ही.ज्यु कॉलेज बाभूळगाव, द्वितीय क्रमांक- स्वरीत सोपे, अथर्व उंडे डी.पॉल.इ.मि.स्कुल येवला, तृतीय क्रमांक- स्नेहल वडाळकर, समृद्धी आहेर, आदिती खैरनार एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल,अंदरसुल यांनी मिळविला.
*दिव्यांग ६वी ते ८वी गटात प्रथम क्रमांक- मोहम्मद हस्सान सोहेल फारुकी एम.एस. जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुल अंदरसुल, तसेच ९वी ते १२वी गटात प्रथम क्रमांक- साक्षी पगारे न्यु इंग्लिश स्कुल सावरगाव.
*शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटात शिक्षक प्रतिकृती प्रथम क्रमांक- शांतीनाथ वाघमोडे जी.प.प्राथमिक शाळा आहेरवाडी ,द्वितीय क्रमांक- योगेश माकोने जी.प. प्राथमिक शाळा दुगलगाव यांनी पटकावला.
*शैक्षणिक साहित्य माध्यमिक गट शिक्षक प्रतिकृती प्रथम क्रमांक- खताळ डी.वाय. जनता विद्यालय मुखेड, द्वितीय क्रमांक- रेणुका किसन भागवत एम.एस.जी.एस. विद्यालय अंदरसुल यांनी मिळविला.
*प्रयोगशाळा परिचर गटात प्रथम क्रमांक- सुवर्णा तुपे आत्मा मलिक इं.मि. पुरणगाव, द्वितीय क्रमांक- दत्तात्रय भागवत जनता माध्य. व उच्च.माध्य.वि. गवंडगाव यांनी मिळविला.
५१वे येवला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशश्वीतेसाठी मातोश्री शांताबाई
गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलातील श्री.राजेंद्र गायकवाड (सं.व प्र.अ.), श्री.मंगेश शिंदे, श्री.अल्ताफ रशीद खान (प्रिंसिपल, एम.एस.जी.एस.इं.मि.स्कुल), श्री.सचिन शांताराम सोनवणे (प्राचार्य,एम.एस.जी.एस. ज्यू.कॉलेज), श्रीमती.जयश्री मोहन परदेशी (मुख्याध्यापिका,एम.एस.जी.एस.सेमी इं.मि.स्कुल), शिक्षक श्री.अमोल आहेर, श्री.गणेश सोनवणे, श्री.सुनील सपकाळ, श्री.महेश मेहेत्रे, श्री.जितेश व्यवहारे, श्री.संतोष जाधव, श्री.शिवप्रसाद शिरसाठ, सौ.माधुरी माळी, सौ.निलिमा देशमुख, सौ.अर्चना एंडाईत, सौ.सुनीता वडे, कु.निदा फारुकी, सौ.शोभा निकम, सौ.शर्मीला पवार, सौ.सुषमा सोनवणे, सौ.काँचन गायकवाड, सौ.सुवर्णा म्हस्के, सौ.आरती जगधने सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री.अजहर ख़तीब, श्री.अमोल आहेर, सौ.सुस्मिता देशमुख व श्री.संदिप बोढरे यांनी केले. शिक्षक श्री.दिपक खैरनार यांनी पाहुण्यांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!