ताज्या घडामोडी

श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा तालुका स्तरीय सांस्कृतिक महोत्सव 2023 -24 मोठ्या उत्साहात साजरा…

*श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा तालुका स्तरीय सांस्कृतिक महोत्सव 2023 -24 मोठ्या उत्साहात साजरा…*
पोलीस टाईम्स न्युज/ सुनिल आण्णा सोनवणे
*चांदवड:* श्रीमती जे. आर. गुंजाळ व उच्च माध्यमिक चांदवड विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव 2023- 24 मोठ्या उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक डॉ.श्री.सयाजीराव गायकवाड, सेवकसंचालक जगन्नाथ निंबाळकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे, पर्यवेक्षक प्रकाश आहेर, शालेय समितीचे अध्यक्ष सुभाष कोतवाल, उच्च शालेय समितीचे अध्यक्ष खंडेराव आहेर शालेय समितीचे सदस्य अशोक व्यवहारे,विजय कोतवाल,प्रकाश शेळके, ॲड.दिनकर ठाकरे .नानाजी पानसरे सुनिल सोनवणे यांचेसह विविध शाखांमधील शाळेचे शाखाप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सरस्वती व नटराजच्या प्रतिमेचे पूजन केले. सांस्कृतिक महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष खंडेराव आहेर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे श्री.संजय लोहकरे यांनी केले.संस्थेचे चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन पर मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच कला व अभियानाचे ज्ञान घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी म.वि.प्र. संस्थेने एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपले व संस्थेचे नावलौकिक उज्वल करावे असे आव्हान केले. उच्च स्कूल कमिटीचे अध्यक्ष खंडेराव (दादा) आहेर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन केले.या सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेत चांदवड केंद्रात प्रथम फेरी पार पडली. या सांस्कृतिक महोत्सवात तालुक्यातील तेरा माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेत समूहगीत गायन स्पर्धा,वैयक्तिक गीत गायन स्पर्धा, वैयक्तिक वाद्य वादन स्पर्धा,समूह नृत्यस्पर्धा हे चार कला प्रकारात घेण्यात आल्या. स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी संस्थेमार्फत परीक्षक प्रा.डॉ. फलके व प्रा.डॉ.निलेश आहेर यांनी काम पाहिले. समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालय चांदवड, द्वितीय क्रमांक डॉ. ना. का. गायकवाड विद्यालय उसवाड, वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक जनता विद्यालय सुतारखेडे, द्वितीय क्रमांक श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालय चांदवड, वैयक्तिक वाद्य वादन स्पर्धेत प्रथम क्रमांक जनता विद्यालय देवरगाव, द्वितीय क्रमांक श्रीराम विद्यालय रायपुर,देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक जनता विद्यालय वडाळीभोई, द्वितीय क्रमांक श्रीमती जे.आर.गुंजाळ विद्यालय चांदवड यांनी मिळवला. सांस्कृतिक महोत्सवात समारोपप्रसंगी म.वि.प्र. संस्थेचे संचालक डॉ.श्री. सयाजीराव गायकवाड,म.वि.प्र. संस्थेचे सेवक संचालक श्री. जगन्नाथ निंबाळकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय लोहकरे, पर्यवेक्षक श्री. प्रकाश आहेर म.वि.प्र. संस्थेतील विद्यालयातील शाखाप्रमुख, डॉ. भालचंद्र पवार, सुनिल सोनवणे, पांडुरंग भडांगे व परीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी, विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक महोत्सवात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सर्व मान्यवरांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अण्णा टर्ले व श्रीमती प्रिया नांदे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. शिवदास कापडणे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!