ताज्या घडामोडी

:*बहुजन क्रांती व भारत मुक्ती मोर्चातर्फे फारुक शेख सन्मानित*

:*बहुजन क्रांती व भारत मुक्ती मोर्चातर्फे फारुक शेख सन्मानित*

भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील विविध धर्मातील व समाजातील कार्य करण्यासाठी आंदोलन करणे, त्यासाठी वेळप्रसंगी केसेस अंगावर घेणे, घरादाराची परवा न करता सामाजिक कार्य करत राहणे अशा प्रकारे प्रवर्तन चळवळ जिवंत ठेवणारे दुर्मिळ कार्यकर्त्यांपैकी मुस्लिम समाजातील मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख हे असल्याने त्यांच्या कार्याचा बहुजन क्रांती व भारत मुक्ती मोर्चा ला अभिमान वाटतो म्हणून सामाजिक प्रतिबंधतेचा गौरव म्हणून त्यांना भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून प्राध्यापक विलास खरात यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या सन्मान पत्रावर महाराष्ट्र राज्याचे संयोजक सुमित्र अहिरे, जिल्हाध्यक्ष देवानंद निकम, तालुकाध्यक्ष सुकलाल पेंढारकर व शहर अध्यक्ष सुनील देहडे भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
फोटो
फारुक शेख यांचा सन्मान पत्र व स्मुर्ती चिन्ह देऊन गौरव करतांना प्रा विलास खरात दिसत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!