ताज्या घडामोडी

काळमवाडी प्रकल्पात 40 कोटीचा गैरव्यवहार; कार्यकारी अभियंता निलंबित

    काळमवाडी प्रकल्पात 40 कोटीचा गैरव्यवहार; कार्यकारी अभियंता निलंबित

    पोलीस टाईम न्युज 24
    कोल्हापूर शहर प्रतिनिधी :- कुणाल दिपक काटे यांची रिपोर्ट:-
    *कोल्हापूर पाटबंधारे कार्यकारी अभियंता विनया बदामे निलंबित*

    काळमवाडी जलसिंचन प्रकल्पात डावा कालव्याच्या कामात 40 कोटींच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंता विनया बदामे यांना निलंबित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.त्याचवेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता ज. द. बोरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूकही. या प्रकल्पाचे अहवाल एका महिन्याच्याआज सादर करण्याचे निर्देशदेखील त्यांनी दिले.
    आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत या घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. या प्रकल्पात आधी काही कोटी रुपयांचा आभार झाल्याचे समोर आल्यावर दक्षता पथकाने कारवाई केली. त्यात ३ कोटी 88 लाख रुपयांचा आहाराचे जबाबदारी निश्चित करण्यात आली. तरीदेखील पुन्हा कंत्राटदाराला तांत्रिक समितीची मान्यता न घेताच 40 कोटी रुपये देण्यात आले, असे आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले.
    कार्यकारी अभियंता आणि अधिकारी जनतेच्या दृष्टीने मूलभूत कामासाठी पैसे देत नाहीत.मुख्यमंत्री,व उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही टाळाटाळ करतात. मात्र, ठेकेदारांना संगनमताने कसे पैसे देतात? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
    काळम्मावाडी प्रकल्पाचा डावा कालवा ७६ कि.मी. चा आहे.
    यातील ३२ ते ७६ कि.मी. कालव्याच्या कामात कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी दक्षता पथक, पुणे यांच्या प्राथमिक अहवाल ७ ऑगस्ट 2020 मध्ये सरकारला प्राप्त झाला. यामध्ये अनियमितता आणि अधिकचा निधी दिल्याचे सिद्ध झाले आहे. कंत्राटदारानेकाम सुरू करण्यापूर्वीच त्यांचे पलंगे ४० कोटींचे बिल कार्यकारी अभियंताने दिले. त्यामुळे कार्यकारी अभियंता यांचे तातडीने निलंबित करण्यात येत असल्याचे त्यांनी घोषित केले

    Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!