क्राईम

सट्ट्यांच्या सट्ट्यांच्या अड्ड्यांवर पोलीसांचा छापा

सट्ट्यांच्या सट्ट्यांच्या अड्ड्यांवर पोलीसांचा छापा

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानजवळ सुरू असलेल्या सट्ट्याच्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता कारवाई केली आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील श्याम प्रसाद मुखर्जी उद्यानजवळ सट्टा दुकानाच्या खेळ खेळला जात असल्याची गोपनी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, फौजदार रवी नरवाडे, पो.हे.कॉ राजेश मेंढे, तसेच शहर पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ उमेश भांडारकर, पो.ना किशोर निकुंभ, रतन गीते, या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने शनिवारी सायंकाळी सट्ट्याच्या अड्ड्यांवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ४ हजार अठशो दहा रुपयांची रोकड व सट्टा जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विजय शामराव पाटील, यांच्या फिर्यादीवरून सट्टा जुगाराच्या खेळ खेळणाऱ्या नितीन मधुकर चौधरी, (वय-४३) याच्या विरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!