क्राईम

राहुल रामचंद्र ब-हाटे यास; एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध

राहुल रामचंद्र ब-हाटे यास; एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात रामेश्वर कॉलनीतील रहिवासी राहुल रामचंद्र ब-हाटे ( वय-३३) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव यास एक वर्षासाठी मध्यवर्ती नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. राहुल रामचंद्र ब-हाटे याच्याविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला ८ आणि जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला १ असे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्न करणे, मोठी दुखापत करणे, गैर कायद्याची मंडळी जमवून दंगल घडवणे, गृह अतिक्रमण, सरकारी नोकरावर हल्ला, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, खंडणी उकळणे अशा स्वरूपाचे सर्व गुन्हे आहेत.
सर्व गुन्हयांमध्ये त्याला वेळोवेळी अटक करण्यात आली होती.
न्यालयातून जामीनवर सुटल्यानंतर देखील तो भारतीय दंड विधान, व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हे करतच होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता तो. स्वत आणि त्याच्यासोबत असणाऱ्या गुंडा सोबत घातक शस्त्र बाळगत असे. या घातक शास्त्रांच्या बळावर तो लोकांवर दहशत व भीती निर्माण करण्याचे काम करत होता. कायदयाचा त्याला अजिबात धाक नसल्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होऊन लोकांचे मनात असुरक्षिततेचे भावना निर्माण झाली होती. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हात भट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार व धोकेदायक व्यक्ती, हकश्वाव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन १९८१ नुसार तो धोकादायक व्यक्ती, या संज्ञेत मोडत असल्यामुळे व त्याची दहशत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी त्याला स्थानबद्ध करण्याकामी पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता.
त्या प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस अधीक्षकांनी जिल्हादंडाधिका-यांकडे पुढील कारवाईसाठी प्रस्ताव पाठवला होता.
त्या अनुशंगाने आज रोजी जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशाने राहुल रामचंद्र ब-हाटे यास १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक गावीत यांच्या मार्गदर्शनखाली आज रोजी त्यास स्थंदबद्ध करण्याचा मी एलसीबी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रताप शिकारे, याच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी,पो.हे.का विनोद बोरसे, पोलीस नाईक योगेश बारी, पो.ना सचिन पाटील, पो.ना गणेश शिरसाळे, पो.कॉ किरण पाटील, तसेच एलसीबी चे सहाय्यक फौजदार युनू शेख इब्राहिम, पो.हे.का सुनील दामोदर, पो.हे.का जयंत चौधरी, आदींनी आज दि. १७ नोव्हेंबर रोजी राहुल रामचंद्र ब-हाटे यास ताब्यात घेतले होते. त्याला स्थानबद्ध करण्याकामी पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पो.हे.कॉ रामकृष्ण पाटील, पोका. मुकेश पाटील आदींचे पथक नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्याकामी रवाना झाले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!