ताज्या घडामोडी

बेशिस्त वाहन चालकांविरोधात येवला शहर पोलिसांच्या वतीने कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहेत

बेशिस्त वाहन चालकांविरोधात येवला शहर पोलिसांच्या वतीने कारवाईची मोहीम राबवण्यात येत असून विना हेल्मेट,नंबर प्लेट नसलेल्या गाड्या ,ट्रिपल सीट,सीट बेल्ट नसलेल्या अशा 35  वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असल्याने बेशिस्त  वाहनधारकांचे या करावाईमुळे धाबे दणाणले आहे.नासिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप , पोलीस उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने सदर कारवाई करण्यात येत असून यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, वाहतूक पोलीस दिलीप शिंदे, सागर वाघवकर, मधुकर गेठे, संदीप पगार,सचिन राऊत,गणेश सांगळे,महिला पोलीस कविता शिंदे या पथकाने सदर कारवाई केली

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!