आरोग्य व शिक्षण

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व शिष्यवृत्ती गुणवंताचा सत्कार संपन्न

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व शिष्यवृत्ती गुणवंताचा सत्कार संपन्न..*
*अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती (बालदिन) साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मकरंद सोनवणे तर अध्यक्षस्थानी रामनाथकाका एंडाईत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.
यानंतर स्कुलच्या वतीने महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत शाळेत व अंदरसुल केंद्रात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु.ईशान सचिन देशमुख व पालक सचिन देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. बालदिन निमित्त स्नेहल देशमुख हिने हिंदी कविता तर स्कुलच्या शिक्षिका कवयित्री शोभा निकम रचित कविता रुचिता खैरनार हिने सादर केली.अमोल आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रामभक्त हनुमान चे लंकादहन करताना उत्कृष्ट चित्र काढल्याबद्दल कला शिक्षक गौरव सैंदाने यांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ खान, विशाल सोनवणे, सचिन देशमुख, प्रशांत बिवाल, मनीष सैंदाने, अजीम पटेल, माधुरी माळी, सुनीता वडे, शर्मिला पवार, नीलिमा देशमुख, चेतना माकूने आदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!