क्राईम

गणपती नगरात एका अज्ञात मातेफिरूने कार आणि दुचाकी जाळली; गुन्हा दाखल

गणपती नगरात एका अज्ञात मातेफिरूने कार आणि दुचाकी जाळली; गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात गणपती नगरातील सातपुडा हाउसिंग सोसायटीमध्ये एकाच गल्लीतील मध्यरात्री अज्ञात मातेफिरूने पेट्रोल टाकून दोन कार आणि एक दुचाकी पेट्रोल जळाल्याची घटना आज घडली.
रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, गणपती नगरातील सातपुडा वाशिम सोसायटी येथे मिलन सलामत राय तलरेजा (वय-३०) आपल्या कुटुंबीयास राहायला आहे. त्यांचे ऑटो पार्टस विक्रीचे व्यवसाय आहे. शुक्रवारी २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:३० वाढदिवसाच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने कापडावर पेट्रोल टाकून कार क्रमांक ( एम एच १९ डीव्ही ४१९३) आग लावून पेटवून दिली. दरम्यान त्यांच्या शेजारी राहणाऱ्या फोन करून कारला आग लागल्याची माहिती मिलन तलरेजा यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी आग वीझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत या आगीमध्ये कारची जळून नुकसान झाले होते. तलरेजा यांनी आठ महिन्यापूर्वीची कार विकत घेतली होती. त्याच्या पद्धतीने त्यांच्या गल्लीतील राहणारे श्रीचंद घंश्यामदास आठवणी.( वय- ४७) यांची देखील कार क्रमांक ( एम एच १९ सीझेड २२ ७७) यांच्यावर देखील त्याच पद्धतीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याच्या प्रकार घडला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी बोरिंगच्या सहाय्याने आग वीज दिली. या संदर्भात मिलन तालरेजा यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता रामनगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करीत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!