क्राईम

२ लाखांचे दागिने चोरी; शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

  1. लाखांचे दागिने चोरी; शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील सुभाष चौक येथील सुभाष डेरी समोरून महिलेच्या कापडी पिशवीतून २ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने चोरुन नेले आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला गुरुवारी अध्याय चोर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून यशोदा संतोष कोळी, ( वय-७०) रा. कठोरा तालुका जि. जळगाव ही आपल्या कुटुंबाच्या राहायला आहे. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० ते पावणेचार वाजेच्या दरम्यान वृद्ध महिला या जळगाव शहरातील सुभाष चौकातील सुभाष डेरी समोर या ठिकाणी बाजार करण्यासाठी आलेल्या होत्या. दरम्यान त्यांच्याजवळ असलेल्या काप्ती पिशवीतून तब्बल २ लांख ११ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून चोरुन नेला. वृद्ध महिलाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु कुठेही माहिती मिळाली नाही. अखेर गुरुवार 27 ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० वाजता वृद्ध महिला यांनी शनी पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ परिस जाधव करित आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!