क्राईम

मेहरुण समशानभूमी जवळ तरुणाला बेदम मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मेहरुण समशानभूमी जवळ तरुणाला बेदम मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील मेहरून येतील समशानभूमी जवळ जुन्या भांडणातुन
हनुमान नगर येथील तरुणाला ४ ते ५ जणांनी लाकडी दांडका असेच धारदार शास्त्रने माहरण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी शनिवारी २२ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एमायडिसी पोलिसात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील हनुमान नगर येथे बिजासन फकीरा घुगे ( वय-२८) हा तरुण राहतो मेहरून मधील तरुणांसोबत बिजासन याच्या जुनावाद आहे.
२१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भैय्या देविदास सोनवणे व केतन जगदीश सोनवणे हे दोघे जण आले. व बिजासन याला तुझ्यासोबत काम आहे. असे म्हणून दुचाकीवरून मेहरून समशानभूमीकडे घेऊन गेले.
या ठिकाणी अजून काही जण उभे होते. या ५ जणांनी जुन्या वादातून बिजासन याला लाकडी दांडक्याने, लाता बुक्क्यांनी तसेच काहीतरी धारदार वस्तूने मारहाण करून गंभीर दुखापात केली. या घटनेत बिजासन हा जखमी असून त्याच्या तक्रारीवरून शनिवारी महारण करणाऱ्या भैय्या देविदास सोनवणे, केतन जगदीश सोनवणे, गोकुळ विठ्ठल बोरसे, प्रविण रमेश सोनवणे, व वासू जाधव सर्व रा. तलाठी ऑफिस जवळ मेहरुन या ५ येणार विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रेय बडगुजर हे करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!