आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

दिव्यांग बंधु बाघिनि च्या दिवाळी साठि मुस्लिम मनियार बिरादरीचा पुढाकार*

*दिव्यांग बंधु बाघिनि च्या दिवाळी साठि मुस्लिम मनियार बिरादरीचा पुढाकार*

प्रतिनिधी शाहिद खान

अंध,अपंग,मूकबाघिर, मतिमंद व सर्व दिव्याग बंधू-भगिनींसाठी अपंग साधना संघ संचलित महाराष्ट्र अपंग विकास संघटना जळगाव चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी जळगाव शहरातील दिव्यांग बांधवांचा दिवाळी सण हा आनंदमय होण्या करिता जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी कड़े विनंती अर्ज केला होता त्यांच्या विनंती अर्जाला प्रतिसाद देत जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी ने त्या सर्व अंध,अपंग व मूकबधिर बांधवांना दिवाळी किट उपलब्ध करून दिले. या किट मधे रवा,मैदा,बेसन साखर, गुड, मका पोहे व तेल या सात वस्तुंचा समावेश होता.

सदर दिवाळी किट चे वाटप शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात रविवारी एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्राचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सचिव महेंद्र वानखेडे यांनी आभार मानले.संघटनेच्या सोनाली माहेश्वरी व मनोहर शिंदे यांनी सहकार्य केले.
बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी आपण आम्हास सेवेची संधी दिली त्याबद्दल आभार मानले व जळगाव शहरातील बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत बिरादारीचे शहराध्यक्ष सैयद चाँद, संचालक हारून मेहबूब व उस्मानियाचे समीर शेख आदिंची उपस्थिती होती.

फोटो कैप्शन
दिव्यांग बांधवांना किटचे वाटप करताना सैयद चाँद,फारुक शेख, हारून शेख, विठ्ठल पाटील ,सोनाली माहेश्वरी, मनोहर शिंदे व महेंद्र वानखेडे सह लाभार्थी दिसत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!