क्राईम

घरफोडीच्या मुख्य फरार आरोपी अटक

घरफोडीच्या मुख्य फरार आरोपी अटक

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात शिवाजी नगर परिसरातील आनंद नागाला यांच्या किराणा दुकानातुन ९० हजार रुपयांची चोरी झाल्या प्रकरणी शहर पोलिसांना घरफोडीच्या गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या दुकानात चोरी करणाऱ्या मुख्य फरार आरोपी एलसीबी पथकाने अटक केली आहे. फिरोज नुर मोहम्मद शाह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हाच्या तपास कामात तिघा आरोपींना एलसीबी पथकाने यापूर्वीच अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी फिरोज हा गेल्या ४ महिन्यापासून फरार होता. तो पोलिसांच्या अभिलेख यावरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मोबाईल चोरीसह घरफोडीचे गुन्हे दाखल आहे.
फरार फिरोज हा जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात आला असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनापाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे पो.हे.का जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पो.ना नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील,. आधी मी त्याच्या शोध घेतला.
रेल्वे स्टेशनच्या मागील भागात पुलाखाली तो तपास पथकाला गवसला. त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास जळगाव शहर पोलीस करत आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!