ताज्या घडामोडी

हातकणंगले तालुका गुरव समाज संघटनेचे कार्य उल्लेखनीय – माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते

हातकणंगले तालुका गुरव समाज संघटनेचे कार्य उल्लेखनीय – माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते

हातकणंगले तालुका प्रतिनिधी/ राहुल घोलप
एज्युकेशन संस्था संचलित गुरव ज्योतिष व वास्तुमार्गदर्शन संस्था यांचा दिपावली शुभमुहूर्त २०२२ पत्रिकेचा प्रकाशन सोहळा शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते,माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्यजित आबा सरूडकर ,जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला .
हिंदूधर्मशास्रानुसार दिपावली मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित करत असताना रुढीपरंपरेचे महत्त्व विषद करण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्थापक डॉ. दादासौ गुरव यांनी प्रामाणिकपणे केलेला दिसून येतो. असे गौरव उद्गार माजी मंत्री दिवाकर रावते यांनी प्रकाशन सोहळ्या वेळी काढले,प्रथा परंपरा, सणवार,रितीरिवाज यांची सांगड घालत विज्ञानाला सोबत घेवून चालणारे ज्योतिषशास्त्र आज अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य हिस्सा बनला असून त्या शास्त्राचा सांभाळ करण्याचे आणि त्याचे पावित्र्य राखण्याचे काम डॉ दादासो गुरव या संस्थेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे करत आहेत. असे गौरव उद्गार माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर यांनी काढले
ज्योतिषशास्त्र हे निव्वळ व्यावसायिक क्षेत्र नव्हे तर ते एक सर्वसामान्यांकरिताचे उर्जास्तोत्र असून त्याचा वापर समाजातील सर्व घटकांना व्हावा अशा प्रकारचे प्रयत्न श्री. गुरव यांचेकडून चालू असून त्यादृष्टीने त्यांनी या विषयाकडे विशेष लक्ष दिले आहे. असे उद्गार माजी आमदार सत्यजित आबा सुरडकर यांनी काढले
नोकरी, व्यवसाय, वास्तू, लग्न तसेच इतर कौटुंबिक कार्यक्रम एवढ्यापुरते मर्यादित हे क्षेत्र नसून समाजातील अनेक गैरसमज व प्रथा बंद करणेसाठी ज्योतिषशास्त्र या विषयाचा उपयोग कसा करता येईल या दृष्टिकोनातून विचार करणारा हा आधुनिक ज्योतिषाचार्य समाजाला निश्चित वेगळी दिशा देणेस यशस्वी होईल हा विश्वास तिथे उपस्थित सर्वांनीच व्यक्त केला.
या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, कोल्हापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे, संभाजी पवार, कोल्हापूर शहराध्यक्ष रविकरण इंगवले, इचलकरंजी शहराध्यक्ष महादेव गौड, सयाजी साळुंखे, महिला जिल्हाध्यक्ष मंगल चव्हाण, माजी आमदार सत्यजित आबा सरुडकर, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर, माजी आमदार चंद्रदीप नरके,हातकणंगले तालुका गुरव समाज संघटना अध्यक्ष अनिल कवाडे( आळते), उपाध्यक्ष दादासाहेब गुरव, पत्रकार विनोद शिंगे,मधुकर गुरव, युवा अध्यक्ष शितल गुरव, कोल्हापूर जिल्हा गुरव समाज अध्यक्ष धनाजी गुरव आरेकर, सहदेव गुरव, डॉक्टर सुरेश गुरव (खोची), कोरोची माजी उपसरपंच महेश गुरव उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!