क्राईम

१ लाख ७० हजार चोरीचा भंगार कार वाहुन नेतांना चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे

१ लाख ७० हजार चोरीचा भंगार कार वाहुन नेतांना चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात एमआयडीसी बी सेक्टर बंद असलेल्या रुख्मा इंडस्ट्री कंपनीतुन चोरलेली भंगार कार क्रेनच्या साह्याने टोईंग करून येणाऱ्या चौघांना एमआयडीसी पोलिसांच्या गस्ती पथकाने अटक केली आहे!
अमन सय्यद रशीद सय्यद, रा. पोलीस कॉलनी सुप्रीम कॉलनी जळगाव, अजय भागवत सुरवाडे, वय-२७) रा. सागर शॉपिंग जवळ आयोध्या नगर जळगाव, सचिन मुकेश सिंग राठोड, (वय-२१) रा. आयोध्या नगर जळगाव, मोहसीन खान सुभान खान,(वय-२७) रा. शेरा चौक, रजा कॉलनी जळगाव, अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आनिसौदिन शेख, पो.ना. हेमंत कळस्कर, व पो.कॉ चंद्रकांत पाटील आदींचे १४ ऑक्टोबर च्या रात्रीगस्तीवर कार्यरत होते. दरम्यान मध्यरात्री २:०० वाजे सुमारास चौघे संसियत भंगार कार क्रेनच्या सहाय्याने वाहून नेत असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले. एमआयडीसीतील हॉटेल कमल पॅरेडाईज समोर त्यांना आढळून आलेल्या चौघांना त्यांच्या ताब्यातील ५०,०००/- रु किंमतीची एम एच ०४ डी.आर ६२६२ ही भंगार स्कोडा कार तसेच १०.०००/- रुपयांची क्रेन व २०,०००/- रु किंमतीची पॅशन प्रो मोटरसायकल असा १ लाख ७० हजार रुपयांच्या मुद्देमाल चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. चौकशी त्यांना आपला कार चोरीचा गुन्हा कबूल केला. अमन सय्यद रशीद हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध ११ तर मोहसीन विरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत.
अटकेतील सर्वांना न्याय श्रीमती जे एस केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्हाच्या पुढील तपास पो.ना. सैय्यद इमरान अली, पो.ना सचिन पाटील आदी करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!