ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये डॉ.अब्दुल कलाम जयंती व मा.छगनरावजी भुजबळ साहेब यांचा ७५ वाढदिवस व जागतिक हात धुवा दिन साजरा.*

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये डॉ.अब्दुल कलाम जयंती व मा.छगनरावजी भुजबळ साहेब यांचा ७५ वाढदिवस व जागतिक हात धुवा दिन साजरा.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये *भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम* जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस *प्रेरणा वाचन दिन* म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणे येवल्याचे भाग्यविधाते *मा. उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब* यांचा ७५ वा वाढदिवस अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंदरसुल ग्रामपालिकेच्या मा. सरपंच विनिताताई अमोल सोनवणे या होत्या तर अध्यक्षस्थानी अमोल आहेर होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यानंतर इ.१ली ची विद्यार्थिनी *पद्मजा योगेश जेजुरकर* हिने छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या कार्यावर भाषण सादर केले.मा.सरपंच विनिताताई सोनवणे, प्रिंसिपल अल्ताफ खान, अमोल आहेर व अजीम पटेल यांनी आपले भाषण सादर केले.मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात चित्रकला, निबंध, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यात ४५० विद्यार्थ्यांनी उस्फुर्त असा सहभाग नोंदवला. यानंतर *”जागतिक हात धुवा दिन”* निमित्त विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व अजहर खतीब यांनी सांगितले व इ.१०वी चे विद्यार्थ्यांनी हात कसे धुवावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.आज स्कुलचा प्रथम सत्राचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांना मा.सरपंच विनिताताई सोनवणे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व प्रदूषण व फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा अजहर खतीब यांच्या बरोबर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतली.
याप्रसंगी भागीनाथ थोरात, दीपक खैरनार, प्रशांत बिवाल, गणेश सोनवणे,अमजद अंसारी, मनीष सैंदाने, गौरव सैंदाने, अजीम पटेल, जयप्रकाश बागुल, माधुरी माळी, चेतना माकूने, शर्मिला पवार, सुनीता वडे, सुश्मिता देशमुख, अर्चना एंडाईत, आलिया खान यासह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अझहर खतीब यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!