ताज्या घडामोडी

*१८ वर्षांनी भेटला शेलु हायस्कूल येथील विद्यार्थी मित्रांचा मैत्रीचा स्नेह मेळावा.*

*१८ वर्षांनी भेटला शेलु हायस्कूल येथील विद्यार्थी मित्रांचा मैत्रीचा स्नेह मेळावा.*
पोलीस टाईम्स न्युज: सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड* : तालुक्यातील शेलु येथे नावारूपास आलेली निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कै. बळवंतराव लक्ष्‍मण जाधव, शेलु येथे दिनांक (१६ नोहेंबर २०२३ ) रोजी अठरा वर्षांनी म्हणजेच २००४-२००५ या वर्षाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अतिशय आनंदात साजरा झाला.

यावेळी वेगवेगळी नियोजन करून कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत केले होते. यावेळी शिक्षकांनी देखील आपली उपस्थिती दर्शवीली. कार्यक्रम वेळी कार्यक्रमाचे माजी मुख्याध्यापक भांबर सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. तसेच यावेळी एम.आर.जाधव सर, कासव मॅडम, पिंपळे सर,आर.पी.जाधव सर, न्याहारकर सर, रायते सर, गांगुर्डे मॅडम, देशमाने सर, त्याचप्रमाणे इतर शिक्षक व शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल व एकमेकांच्या आठवणींचा उजाळा या ठरलेल्या कार्यक्रमाच्या वेळेत कार्यक्रम हसतखेळत होत पूर्ण दिवस कसा निघून गेला हे कोणाच्या लक्षात आले नाही इतका आनंद या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. कार्यक्रमाच्या वेळी वर्षा पवार व रूपाली इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापली ओळख करत आपण कोणत्या कार्यक्षेत्रात काम करतो किंवा शेतीपूरक व्यवसाय करतो याबाबत माहिती दिली. अनेक विद्यार्थी हे काळानुरूपाने बदलत गेले त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यात घडलेले बदल हे देखील सर्वच मित्र एक मेकाना सांगण्यास व ऐकण्यास उत्सुक होते. राजेंद्र जाधव, रवींद्र जाधव, सोपान मोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच किशोर वांजूळे यांनी यावेळी वेगवेगळ्या स्वरूपाची रोख रकमेची बक्षीसे देण्याचा मानस सर्वांसमोर ठेवत एक आदर्श ठेवला.

तसेच जमलेल्या पैशातून याच ग्रुपमधील गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दप्तर, वह्या, पुस्तके, पेन यासारखे शालेय उपयोगी वस्तू देण्यात आले. तसेच शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले व शिक्षक वृंद यांना देखील वेगवेगळ्या झाडांची रोपे देऊ सत्कार करण्यात आला. सर्वांनी अल्पोउपहाराचा आस्वाद घेत आलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत फोटो घेत पुढच्या वर्षी नक्की भेटू अशाच आठवणीना उजाळा देण्यासाठी एकत्र येऊ असे सांगत एकमेकांना निरोप दिला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!