मध्य रेल्वे रेलपथ कार्यालयाचे* *चीफ मनोज कुमार* *निराला यांचा निरोप* *कार्यक्रम संपन्न.*
*मध्य रेल्वे रेलपथ कार्यालयाचे* *चीफ मनोज कुमार* *निराला यांचा निरोप* *कार्यक्रम संपन्न.* *भारती धिंगान (प्रतिनिधी)* नाशिक. मध्य रेल्वेतील सीनियर सेक्शन इंजिनियर कार्यालय नाशिक रोडचे चीफ सीनियर सेक्शन इंजिनियर मनोज कुमार निराला यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रेलपथ कार्यालयात नुकतीच बदलीचे आदेश प्राप्त झाल्याने नाशिक रोड येथील रेलपथ कार्यालयातील युनिट नंबर एक ते सहा पर्यंतचे ट्रॅक मेंटेनर वेल्डर, लोहार, यांनी निराला साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या ठिकाणी मुकेश आर्या साहेब यांना बढती मिळाल्याने त्यांचेही या ठिकाणी सत्कार समारंभ घेण्यात आले. याप्रसंगी विविध मान्यवरांनी निराला साहेबांच्या उत्कृष्ट कामाबद्दल कौतुक केले. साडेचार वर्षाच्या कार्यकाळात सेक्शन चे कामकाज मोठ्या हिमतीने पार पाडले. त्यात भुसावळ मंडळाकडून एक नव्हे तर दोन पुरस्कार पटकाविणारे असे व्यक्तिमत्व लाभलेले साहेब कर्मचाऱ्यांपासून दूर जात असल्याने खंत व्यक्त करीत मोठ्या मनाने त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा चा वर्षाव केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन डेपो इन्चार्ज मुकेश आर्या साहेब यांनी केले. तर सूत्रसंचालन संजय बेनके यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने रेल्वे अधिकारी व ट्रॅक मेंटेनर कर्मचारी उपस्थित होते.