ताज्या घडामोडी

मराठा आरक्षणावर बोलणाऱ्या भुजबळांना नेमक शिजवायच तरी काय? मराठा मावळा संघटना नासिक जिल्हा अध्यक्ष देविदास गुडघे पाटील यांचे उद्गार!!

मराठा आरक्षणावर बोलणाऱ्या भुजबळांना नेमक शिजवायच तरी काय?

मराठा मावळा संघटना नासिक जिल्हा अध्यक्ष देविदास गुडघे पाटील यांचे उद्गार!!

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मराठा समाजाचा इतका द्वेष असेल असं कधीही वाटल नव्हत.भुजबळ यांनी ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षणास तीव्र विरोध केला असून, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे बेकायदा आहे, असे म्हटले आहे. ते मंत्री, लोकसेवक आहेत. मंत्रिपद स्वीकारताना त्यांनी भारतीय राज्य घटनेची अनुसूची तीनप्रमाणे शपथ घेतली आहे. शपथेत भारतीय राज्यघटनेशी विश्‍वास व निष्ठा दाखविण्याचे कबूल करून प्रतिज्ञा घेतली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे मराठा व ओबीसी गटात द्वेष भावना वाढली आहे. किती दिवस मराठा समाज हा अन्याय सहन करणार!! विरोध करण्यालाही एक सीमा असते.हि सीमाही भुजबळांनी पार केली आहे.त्यांना मराठा समाजाप्रती प्रचंड द्वेष असल्याने त्यांनी त्यांचा बोलण्यातून लक्षात आणून दिले आहे.त्यामूळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला आहे.त्यांनी लोकसेवक असूनही कायद्यातील तरतुदींची जाणीवपूर्वक अवज्ञा केली आहे.आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मराठा समाजानेच त्यांना मोठं केलं आहे.भुजबळ हे एका विशिष्ठ समाजाचाच नारा लाऊन धरत आहे.बाहेरून पराभव पत्कारून आलेल्या भुजबळांना गेल्या २० वर्षांपासून येवला-लासलगाव मतदार संघातील सर्वच जाती धर्माच्या लोकांनी त्यांना उचलून धरले आहे.तसेच स्थानिक पातळीवर नेत्यांनी ज्याची त्याची पोळीच भाजण्याचे प्रयत्न केले.आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासु लागली आहे.अशा आपत्कालीन परिस्थितीत भुजबळांनी एका विशिष्ठ ओबीसी समाजाचीचं बाजू पकडुन.ओबीसी नेते असल्याचे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.आणि तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांनी बघ्याची भुमिका घेतली असुन.समाजाचे त्यांना कुठलच देणं घेणं दिसत नाही.हे सिद्ध होत आहे.भुजबळ हे मराठा समाजाचे उपकार लवकर विसरले आणि त्याची परत फेड मराठा समाज त्याचा हक्क मागत आहेत.अशा प्रसंगी समाजाच्या पाठी उभ न राहता सपशेल विरोध करत आहे.हे कितपत योग्य असू शकते?
मराठा समाजाला ओबीसी मधून मिळू नये अशा फुटीचा पाढा भुजबळ वारंवार वाचत आहे. भुजबळांना नेमक सिद्ध तरी करायचं काय आहे.असा प्रश्न आता उद्भवु लागला आहे. यामधून भुजबळांना ओबीसी चे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याचे डोहाळे लागलेले दिसत आहे. परंतु यामधून भुजबळांप्रती मराठा समाजाचा द्वेष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय ओबीसी नेतेही गरळ ओकू लागले आहे.मराठा समाजाच्या या अडचणी त्यांनी कटाक्षाने पाहणे गरजेचे आहे. नाहीतर येणाऱ्या काळात मराठा समाज त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्या वाचून राहणार नाही. हे पणं तितकेच खरे आहे.
मग गरीब मराठ्यांना आरक्षण का? मिळू नये!!तुंम्ही खाल्ले ना फुकट ओबीसी तुन अनेक वर्षे आरक्षण आता सर्व महाराष्ट्राला समजले आहे.सर्व मराठा समाज्याने तुम्हाला मोठे केले.त्यांच्याविरुध्दच तुम्ही ताकद दाखवता,दादागिरी दाखवता.बरर २०२४ ला ह्याची व्याजासकट मराठा समाज परतफेड करणार हे नक्की.ज्या दिवशी व्यक्ती,निष्ठा आणि पक्ष निष्ठा यापेक्षा समाज निष्ठा वरचढ ठरेल,त्या दिवशी मोठं मोठी वृक्ष उन्मळून पडतील.
अशी भूमिका देविदास गुडघे पाटील, मराठा आंदोलक येवला- ममदापूरकर यांनी मांडली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!