ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांना जयंती निमित्त आदरांजली

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांना जयंती निमित्त आदरांजली.*
अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये लोकमान्य टिळक व स्वातंत्र्य सेनानी चंद्रशेखर आझाद यांना जयंती निमित्त आदरांजली देण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा.राजेंद्र गायकवाड तर अध्यक्षस्थानी स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ खान होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी माळी यांनी केले.यानंतर कांचन देवरे, सृष्टी एंडाईत, वर्षा शर्मा, अनुष्का आरखडे, सुयोग वाकचौरे, प्रज्वल आहेर यांनी आपले भाषण सादर केले.अध्यक्षीय भाषणांत अल्ताफ खान यांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी ओम कचरे या विद्यार्थ्याने लोकमान्य टिळक यांचा पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी अजहर खतीब, अमोल आहेर, गणेश सोनवणे, अजीम पटेल, पारस भगत, राजेश कांबळे, सचिन घोडके, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, सुनीता वडे, शोभा निकम, साक्षी देशमुख, प्रतीक्षा चव्हाण, मयुरी एंडाईत सह सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम घोंघाणे व पुनम जमधडे यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!