ताज्या घडामोडी

संतोष एन दराडे पॉलिटेक्निक मध्ये विध्यार्थांना नवीन कायद्याचे मार्गदर्शन*

*संतोष एन दराडे पॉलिटेक्निक मध्ये विध्यार्थांना नवीन कायद्याचे मार्गदर्शन*
येवला : जगदंबा शिक्षण संस्थेच्या संतोष एन दराडे पॉलिटेक्निक मध्ये विध्यार्थांना भारतीय न्याय संहितेमध्ये कायद्यात झालेलं बदल व त्यांचे स्वरूप याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या वेळी येवला पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश सांगळे जगदंबा शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे संतोष एन दराडे पॉलिटेक्निक चे प्राचार्य उत्तम जाधव प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमात सुरवातीला उपस्थित मान्यवरांचा पॉलिटेक्निक च्या वतीने सत्कार करण्यात आला. भारतीय न्याय संहितेमध्ये विविध प्रकारचे कायदे समाविष्ट आहेत परंतु कायद्यांमध्ये बदल करून नवीन कायदे व त्यांचे स्वरूप कसे आहे कुठल्या गुन्ह्यासाठी कोणता कायदा वापरला जातो व तसाठी कुठल्या प्रकारच्या शिक्षेची तरतूद त्यामध्ये आहे तसेच जुन्या कायद्यामध्ये व नवीन सुधारित कायद्यामध्ये कुठल्या प्रकारची सुधारणा करण्यात आलेली आहे याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लोखंडे यांनी विध्यार्थांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले तसेच विध्यार्थांच्या मनात असणाऱ्या कायद्याबाद्दलच्या शंकांचे समाधानकारक उत्तरे दिली. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे सार या विषयासाठी कायद्यांचा अभ्यास व त्यातील बदल विध्यार्थांना माहित असणे किती महत्वाचे आहे याबद्दल प्राचार्य उत्तम जाधव यांनी विध्यार्थांना मार्गदर्शन केले. या वेळी विभागप्रमुख ज्ञानेश्वर धनवटे,शोराब शेख,जयंत केंगे, राहुल आहेर, योगेश खरात, करीम अन्सारी, एकनाथ इंगळे, मोनाली कोकाटे, मानसी संसारे, रोशनी गुंजाळ, ज्ञानेश्वरी बनसोडे, आदींसह शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!