ताज्या घडामोडी

आरटीई २५% आरक्षण अंतर्गत शै.वर्ष २०२४-२०२५ इयत्ता १ली साठी बालकांचा प्रवेश निश्चित करणे.*

*आरटीई २५% आरक्षण अंतर्गत शै.वर्ष २०२४-२०२५ इयत्ता १ली साठी बालकांचा प्रवेश निश्चित करणे.*
येवला तालुक्यात आरटीई अंतर्गत खाजगी विना अनुदानित – स्वयंअर्थसहाय्यित शाळां मध्ये २५% जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.त्यानुसार पालकांनी आपले कागद पत्रे पडताळणी समिती येवला मार्फत तपासणी करून आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करून घेणे. येवला तालुक्यातील सुमारे २६ शाळांमध्ये २५६ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लॉटरी द्वारे नंबर लागले आहे.तरी ऑनलाईन नंबर लागलेल्या पालकांना दि.२२/७/२०२४ रोजी SMS येईल. पालकांनी SMS वर अवलंबून न राहता www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन आपला फॉर्म वरील अर्ज क्रमांक टाकून आपला नंबर लागला की नाही हे तपासून घ्यावे. ज्या पालकांचे ऑनलाईन नंबर लागले आहे त्यांनी दि.२३/७/२०२४ पासून ते ३१/७/२०२४ पर्यंत आपले कागद पत्रे पडताळणी समिती यांच्या कडे जमा करावे व तपासणी झाल्या नंतर आपले ऍडमिट कार्ड घेऊन जावे.असे पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री. संजय कुसाळकर यांनी सांगितले.
येवला तालुक्यातील २६ शाळांची माहिती खालील प्रमाणे…
१.मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल, २.स्वामी मुकतानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, येवला, ३.जय बाबाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, नगरसूल, ४.जीवन अमृत इंग्लिश मिडीयम स्कूल, मुखेड, ५.आर्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, पारेगाव, ६.अभिनव बालविकास मंदिर, येवला, ७.आत्मा मालीक इंग्लिश मिडीयम स्कूल, येवला, ८.आत्मा मालीक गुरुकुल, पुरणगांव, ९.कांचन सुधा अकॅडमी, येवला, १०.अभिनव बालविकास मंदिर, पाटोदा, ११.एस.एन.डी. इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, बाभुळगाव, १२.एस.एन.डी. इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल, बाभुळगाव, १३.गणाधीश इंटरनॅशनल स्कूल, राजापूर, १४.श्री साईनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल, धुळगाव, १५.बनकर पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, अंगणगाव, १६.लक्ष्मी इंग्लिश मिडीयम स्कूल, विखरणी, १७.राधिका इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल, १८.राजेश कदम इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव नेऊर्, १९.संतोष इंग्लिश मिडीयम स्कूल, रहाडी, २०.मातोश्री इंटरनॅशनल स्कूल, धानोरे, २१.सईग्रीन इंग्लिश मिडीयम स्कूल, नगरसूल, २२.कांचन सुधा इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, धानोरे, २३.संतोष इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव नेऊर्, २४.साईं सिद्धि इंग्लिश मेडियम स्कूल पारेगांव, २५.होरायझन अकॅडमी आड़गांव चोथवा व २६.सावित्रीबाई फुले इंग्लिश मेडियम स्कूल उंदीरवाड़ी.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!