ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत नांदूर झाली आयएसओ ग्रामसेवक सुरेखा अहिरे व सरपंच यांनी स्वीकारले प्रमाणपत्र*

*ग्रामपंचायत नांदूर झाली आयएसओ ग्रामसेवक सुरेखा अहिरे व सरपंच यांनी स्वीकारले प्रमाणपत्र*

येवला तालुक्यातील नांदूर या ग्रामपंचायतीस उत्तम सेवा, पारदर्शक कामकाज, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी ,दप्तराचे सुयोग्य वर्गीकरण, कामकाजात पद्धतशीरपणा इत्यादी गुणांच्या कसोटीवर खरे उतरत ISO 9001-2015 प्रमाणपत्र प्राप्त झाले. ग्रामपंचायत नागरिकांना देत असलेल्या सोयी सुविधांचा दर्जा या प्रमाणपत्राद्वारे सिद्ध झाले. व्ही आर एस सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या शासनाने नेमलेल्या संस्थेद्वारे आयएसओ 9001-2015या प्रमाणपत्राकरीता अर्ज केलेला होता. ग्रामपंचायत नांदुर ने सर्व निकषांची पूर्तता केल्याने ग्रामपंचायतीस आयएसओ 9001 2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीनुसार मानांकन देऊन गौरविण्यात आले ग्रामपंचायत नांदूर ला यापूर्वी देखील पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार ,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, उत्कृष्ट प्रभाग पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत ग्रामसेवक श्रीमती सुरेखा अहिरे यांच्या प्रयत्नातून व सरपंच पोलिस पाटील राजेंद्र बर्डे, भाजप जिल्हा चिटणीस संतोष काटे सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून नांदुर ग्रामपंचायत चे सर्वञ कौतुक होत आहेत ,भावि वाटचालीस संतोष काटे
भाजप चिटणीस नाशिक जिल्हा ग्रा,यानींशुभेच्छा!!दिल्या

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!