ताज्या घडामोडी

घरकुल बांधण्यासाठी मागितले चक्क पोलिस संरक्षण

घरकुल बांधण्यासाठी मागितले चक्क पोलिस संरक्षण

पिंपळगाव बसवंत : पीएम घरकुल

आवास योजनेतून घर बांधण्यासाठी अर्थसाह्य मिळते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होते; मात्र ते घरकुल बांधण्यासाठी चक्क पोलिस संरक्षण घ्यावे लागत असल्याचा प्रकार निफाड तालुक्यातील पालखेड ग्रामपंचायतीवर आला असून तसे पत्र पिंपळगाव पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.

निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत पालखेडकडून पिंपळगाव पोलिस ठाण्याला एक पत्र देण्यात आले आहे. त्या पत्रात लाभर्थी कुटुंबाला घरकुल बांधण्यासाठी पोलिस संरक्षण मिळावे, असे नमूद करण्यात आले आहे. त्याचे कारण त्या पत्रात दिले आहे की,

पालखेड येथील कमलाकर दावल बिडवे यांना ग्रामपंचायतीने राहण्यासाठी १५ बाय २० ची जागा दिलेली आहे, त्यांना शासनाकडून पंतप्रधान मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल वर्ष २०२३/२०२४ मंजूर झाले आहे. त्यांना घरकुल बांधण्यास संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने ग्रामपंचायत जागेत बांधत असलेले कमलाकर बिडवे यांच्या घरकुल बांधण्यात अडथळा निर्माण करत असून ते वाद करत आहे आणि हा वाद विकोपाला जाऊन गावाची शांतता भंग होऊ नये, यासाठी सुरक्षिततेसाठी लाभार्थी बिडवे यांना पोलिस संरक्षण मिळावे, असे पत्र पिंपळगाव पोलिस ठाण्यात दिले आहे.

मला ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेत मी मंजूर झालेले मोदी आवास घरकुल बांधत आहे. मात्र, शेजारी राहणारे रहिवासी घर बांधण्यासाठी अडथळा निर्माण करत वाद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे वाद होऊ नये म्हणून मी ग्रामपंचायतीला कळवले असून, मला माझ्या हक्काचे घर बांधून देण्यासाठी सहकार्य करावे, ही विनंती केली आहे.

– कमलाकर बिडवे, घरकुल लाभार्थी, पालखेड

नमस्कार नाशिक ग्रामीण

पृष्ठ क्रमांक 7 जुलै 21, 2024

आपसातील वाद

■ शेजारीच योजनेला आडवा आल्याने पोलिसांना निवेदन ■ पी.एम. किसान योजनेतील लाभार्थी राहाणार वंचित

■ जागा मंजुर असतांनाही केवळ- शेजारी राहाणारे विरोध करीत असल्याने ग्रामपंचायतीने घेतली दखल

ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कमलाकर बिडवे यांना मोदी

आवासअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहे.

त्यात त्यांची जागा ग्रामपंचायतीमार्फत मोजून देण्यात आलेली आहे; मात्र शेजातील कुटुंब ज्याने स्वतःचेच घर अतिक्रमण करून बांधले आहे ते लाभार्थी बिडवे यांच्या घरकुल बांधण्यात अडथळा आणत आहेत. त्या दोघांमध्ये वाद होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीला ठराव करून देण्यात आला.

– अश्विनी आहेर, सरपंच, पालखेड

पालखेड येथील घरकुल

बांधण्यासंदर्भात ग्रामपंचायतीकडून अर्ज प्राप्त झाला असून, यात जर कोणीही वाद निर्माण करीत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. –

दुर्गेश तिवारी, पोलिस निरीक्षक

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!