ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महर्षी कृष्णद्वैपायन वेदव्यास जन्म दिन “गुरू पौर्णिमा” साजरी.*

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महर्षी कृष्णद्वैपायन वेदव्यास जन्म दिन “गुरू पौर्णिमा” साजरी.*
येवला तालुक्यातील नामांकित अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये “गुरू पौर्णिमा” साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेला व कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश सोनवणे यांच्या हस्ते सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. आषाढ शुकलच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता, हा दिवस “गुरू पौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंच्या चरणांचे पूजन करतात व आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतात. महर्षी कृष्णद्वैपायन वेदव्यास यांनी महाभारताची रचना केली होती. कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षक अमोल आहेर यांनी मांडली.तसेच इ.९वी ची दिशा धिवर हिने “गुरू माझे दत्त दिगंबर” ही गीत गायन केले. त्यानंतर इ.१०वीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सत्कार केले. तसेच शिक्षिका शोभा निकम यांनी आपली कविता “नमन सर्व गुरूंना” सादर केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थी आराध्या कदम, खदीजा खान, वैष्णवी आहेर, माधव ढोले, अनुष्का आरखडे, आरुषी खैरनार,
मोहम्मद अली खान, आदर्श देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षिका शर्मिला पवार यांनी गुरू पौर्णिमाबद्दल माहिती दिली.त्यानंतर अध्यक्षीय भाषणात गणेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास शिक्षक अझहर खतीब, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, प्रतिक्षा चव्हाण, अजीम पटेल, सचिन घोडके, पारस भगत, राजेश कांबळे, पूनम घोंगाणे, साक्षी देशमुख, पूनम जमधडे सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल खैरनार व श्रुती फाळके यांनी केले तर आभार शिक्षक दीपक खैरनार यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!