ताज्या घडामोडी

वाघबीळ ते आवळी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर चिखलगुठ्ठा; दुचाकीस्वारांची तारेवरची कसरत* बांबरवाडी जवळील रस्त्यावर दुचाकीस्वारांची कसरत…

*वाघबीळ ते आवळी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर चिखलगुठ्ठा; दुचाकीस्वारांची तारेवरची कसरत*

बांबरवाडी जवळील रस्त्यावर दुचाकीस्वारांची कसरत…
—————————-

*कोल्हापूर-प्रतिनिधी* गेल्या काही महिन्यांपासून नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचे काम मोठ्या शिताफिने सुरु आहे. अर्थातच त्यामुळे
वाहतूक वेगाने होणार आहे. मात्र सध्या महामार्गाच्या कामाने रस्त्यावर चिखलच चिखल दिसत असून जणू भातासाठी होणाऱ्या
चिखलगुठ्ठ्याची प्रचिती येत आहे. यामध्ये आंबवडे, आवळी, नावली आणि बांबरवाडी जवळील रस्ता म्हणजे धोकादायक अवस्थेत
आहे. या रस्त्यावर वाहनांची खूपच सततची वाहतूक असल्याने रस्त्यावरील चालू कामकाजाची माती असल्याने चिखलाची रेबडी झाली
आहे. चारचाकी वाहने कशी तरी मार्ग काढत जात आहेत. मात्र चिखलातून कसे
जायचे? चारचाकी वाहनांपासून अंगावर येणारा चिखल कसा चुकवायचा कि निसरणारी गाडी सावरायची? या साऱ्यातून सावरत
तारेवरची कसरत करत जावे लागत असल्याचे चित्र आहे. तर काहीजणांना घसरून अपघातास सामोरे जावे लागले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणे अवघड होऊन बसले आहे. त्यांच्या गुरांना तसेच शेतीसाठी लागणाऱ्या छोट्या वाहनांना
नेता येत नसल्याचे चित्र आहे. इथल्या रस्त्याची बिकट परिस्थिती पाहत बसण्याशिवाय पर्याय नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
तर चिखलमय रस्त्यावर अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असल्याचे तसेच दोन दिवसापूर्वी येथील एका १५ फुट खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडून जखमी झाला आहे. खड्डा आणि चिखलमय रस्ता याबाबत कोणतेही फलक नसल्याचे मिठरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अजित जगताप यांनी सांगितले.
चौकट – सध्या महामार्गाचे काम सुरु त्यावरील चिखलाचे साम्राज्य वाहतुकीची मोठीं समस्या बनली आहे. वाहनधारकांना खूपच त्रास
होत आहे. चिखल चुकवायचा कि खड्डा हा मोठा प्रश्न आहे. याबाबतची उपाययोजना व्हावी.
धनाजी गुरव माजी सरपंच आंबवडे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!