ताज्या घडामोडी

पडसाळी लघु प्रकल्प शंभर टक्के कासारी जांभळी नदीचे पाणी पात्राबाहेर, नदीवरील बंधारे पाण्याखाली*

*पडसाळी लघु प्रकल्प शंभर टक्के कासारी जांभळी नदीचे पाणी पात्राबाहेर, नदीवरील बंधारे पाण्याखाली*
*किरण मस्कर-कोल्हापूर*
शनिवारी मध्यरात्री पासून कासारी व जांभळी खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पडसाळी लघु प्रकल्प शंभर टक्के भरला. तसेच कासारी व जांभळी नदीस पुर आला असून नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. परिणामी कासारी नदीवरील वाळोली, बाजारभोगाव, पेंडाखळे , करंजफेण, बर्की बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहे.

कासारी मध्यम प्रकल्प (गेळवडे) परिसरात मागील चोवीस तासात १३० मिलीमीटर पाऊसांची नोंद झाली असून १ जून ते आज १४ जुलै अखेर १७८१ मिलीमीटर पाऊसांची नोंद झाली आहे. तर गतवर्षी आजअखेर १२१० मिलीमीटर पाऊस झाला होता. याची प्रकल्पाची क्षमता २.७७ टी एम सी इतकी असून सध्या धरणात १.५२ टी एम सी इतका साठा झाला आहे. या प्रकल्पामधून वीजनिर्मीतीसाठी २५० क्युसेक प्रति सेकंद दराने कासारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे तसेच कुंभवडे व पडसाळी हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरला असून धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर पोंबरे ९२ नांदारी ९० टक्के, केसरकरवाडी लघु प्रकल्प ७० टक्के पर्यत भरले आहे. बाजारभोगाव परिसरात मुसळधार पडत असल्यामुळे कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे . जर पावसाचा असाच जोर राहिल्यास कोल्हापूर – बाजारभोगाव- अणुस्करा- राजापूर हा राज्यमार्गावर पाणी येवू शकते.

चौकट
तर विसर्ग वाढवावा करावा लागेल
कासारी मध्यम प्रकल्प परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने हे प्रकल्पात ५५ टक्के पाणीसाठा झाला आहे सध्या या प्रकल्पातून वीजनिर्मीतीसाठी २५० क्युसेक प्रति सेकंद दराने कासारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे
असाच पावसाचा जोर राहिल्यास दोन दिवसांनी मुख्य गेट मधून आणखी विसर्ग सुरू करावा लागेल
सचिन लाड
शाखाधिकारी पन्हाळा पाटबंधारे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!