ताज्या घडामोडी

कोल्हापूर-प्रतिनिधी। ……कामाच्या ठिकाणी सापडलेली जिवंत घोरपड विक्री करताना बहिरेवाडी

कामाच्या ठिकाणी सापडलेली जिवंत घोरपड विक्री करताना बहिरेवाडी (ता.पन्हाळा) येथील तिघाजणांना राक्षी वनरक्षक अमर माने यांनी रंगेहात पकडले.त्यांच्याकडे पकडलेली घोरपड वनविभागाने ज्पत केली.जप्त दिंगबर सिद्राम रोहिने, प्रकाश श्रीपती बत्ते, केदार वसंत भोसले (सर्वजण, रा.बहिरेवाडी, ता.पन्हाळा) तिघा संशयित आरोपींना पन्हाळा वनविभागाने ताब्यात घेऊन वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये शिकारीच्या कलमानूसार त्यांच्यावर कारवाई केली.

अधिक माहिती अशी, बहिरेवाडी येथील प्रकाश बत्ते यांना गोठ्याचे काम करताना जिवंत घोरपड सापडली होती.त्यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने ती घोरपड गुरूवार (दि.११) रोजी वारणानगरपैकी बहिरेवाडी येथील वारणा मोबाईल शॅापीच्या समोर विक्रीसाठी आणल्याची माहिती वनरक्षक अमर यांना समजली होती.त्यानुसार संशयित आरोपी दिंगबर रोहिणे, प्रकाश बत्ते आणि केदार भोसले यांच्याकडे अमर माने यांनी कसून चौकशी केली असता.किटलीसारख्या भांड्यात जिवंत घोरपड दिसून आली.त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर घोररड विक्रीसाठी आणल्याचे कबूल केल्याने त्यांच्यावर वन्यजीव ॲक्टनुसार कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई कोल्हापूर उपवनसंरक्षक गुरूप्रसाद, अदिती भारद्वाज, सहा.वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा वनक्षेत्रपाल अनिल मोहिते, वनरक्षक अमर माने, संदिप पाटील, बाजीराव देसाई यांनी कारवाई केली.
फोटो ओळ
बहिरेवाडी (ता.पन्हाळा) येथील जिवंत घोरपड विक्रीसाठी आलेल्या जिवंत घोरपड जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले.यावेळी आरोपींच्या समवेत पन्हाळा वनविभागाचे वनरक्षक अधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!