ताज्या घडामोडी

मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरी करणास मंजुरी द्या – मंत्री छगन भुजबळ*

*भारतमाला परियोजनेअंतर्गत येवला बायपाससह मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरी करणास मंजुरी द्या – मंत्री छगन भुजबळ*

*भारतमाला परियोजनेअंतर्गत येवला बायपाससह मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी द्या*

*मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी*

*नाशिक,येवला,दि.१३ जुलै :-* भारतमाला परियोजनेअंतर्गत येवला बायपाससह मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरी करणास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नॅशनल हायवे ७५२ जी हा इकॉनॉमिक कॉरिडॉर नॅशनल हायवे ५२ आणि नॅशनल हायवे ६१ नॅशनल हायवे १६० सह जोडणारा सर्वात जवळचा उत्तर दक्षिण महामार्ग आहे. तसेच नॅशनल हायवे ७५२ जी हा उत्तर भारतापासून शिर्डीला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. नॅशनल हायवे ७५२ एच च्या शिवूर ते येवला २९.१० किलोमिटर विभागाच्या उन्नतीकरणासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ₹ १८१.०८ कोटी मंजूर केले. हा मार्ग येवला शहरातील नॅशनल हायवे ७५२ जी ला फत्तेबुरुज नाका जंक्शन येथे मिळतो.
त्यामुळे छत्रपती संभाजीनगर वरून नाशिक कडे जाणारी वाहतूक शिर्डीच्या रस्त्यावर नॅशनल हायवे ७५२ जी वरील फत्तेबुरुज नाका येथे विलीन झाल्याने येवला शहरात प्रचंड गर्दी होऊन वाहतूक मंदावली असून यामध्ये तातडीने हस्तक्षेपाची गरज आहे.

येवला शहरातून जाणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे शिर्डी आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो. याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीसह प्रमुख बाजारपेठ आहे आणि महामार्गालगत राज्य परिवहन बस डेपो देखील आहे. देशातील एकुन २३५९ किसान रेल्वे पैकी १८३८ म्हणजे सुमारे ७८ टक्के एकट्या महाराष्ट्रातून जातात. त्यामध्ये जानेवारी २०२१ ते मे २०२२ पर्यंत नगरसुल मधून ४४० तर येवला व लासलगाव मधून प्रत्येकी १०० रेल्वे मालवाहतूक करण्यात आली. यामध्ये कांदा, द्राक्षे, टोमॅटो,खरबूज या पिकांची चितपूर, फतुहा, आगरतळा, नौगाचिया, छपरा, बैहाता, धुपगुरी, संकरेल, डंकुनी, गौरमालदा, गुवाहाटी, न्यूजलपाईगुडी, दिल्ली येथे वाहतूक करण्यात आली. या सर्व किसान रेल मधील कांदा व इतर शेतमाल येवला कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये मधून जातो. या मालाची वाहतूक नॅशनल हायवे ७५२ जी ओलांडून रेल्वे स्टेशनवर केली जाते त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होते. तसेच येवल्यातील कांदा अनकाई येथे गुड्स शेड निर्मितीनंतर नॅशनल हायवे ७५२ जी मार्गे पोहचवला जातो.

या रस्त्यावरून सन २०२१- २२ मध्ये ७३ टक्के मालवाहतूक केली होती. यामध्ये ३५० किमी पेक्षा कमी अंतरावर ८२ टक्के तर ६०० किमी अंतरासाठी ६२ टक्के मालवाहतूक झाली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पामध्ये ₹ २२ लाख कोटी गुंतवणुकीसाठी सन २०३१-३२ पर्यंत ३० हजार ६०० किलोमीटरच्या गुंतवणुकीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मागितली आहे. यामुळे ४ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांची वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

नॅशनल हायवे ७५२ जी च्या मनमाड-येवला-कोपरगाव सेक्शनचे येवला शहर बायपाससह चार लेनमध्ये सुधारणा भारतमाला परियोजनेअंतर्गत अखंड मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीच्या अंतर कॉरिडॉर स्पर पद्धतीने शक्य आहे. या महामार्गामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या या धोरणाला मदत होईल तसेच उत्तर दक्षिण कंटेनर वाहतुक देखील सुरळीत होईल.
उत्तरेकडून दक्षिणेत जाणारे जड कंटेनर येवला बायपास च्या बाभूळगाव, आंगणगाव, पारेगाव मार्गे वळतील तसेच प्रवासी आणि स्थानिक मालवाहतूकीसाठी स्वतंत्र रस्ता उपलब्ध करेल ज्यामुळे येवला शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे म्हटले आहे.

येवला बायपास हा प्रस्तावित पीएम मित्रा सिल्क पार्क आणि येवला औद्योगिक वसाहत यांना राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हिटीचा स्पर्धात्मक लाभ देऊन सामाजिक आर्थिक विकासाचा प्रसार करण्यास उपयोगी ठरणार आहे. अलीकडेच मनमाड रेल्वे ओव्हर ब्रिज पर्यंतचा मुख्य रस्ता कोसळल्याने या महामार्गावरील वाहतूक नांदगाव मार्गे वळवण्यात आली ज्यामुळे उत्तर दक्षिण साखळी पुरवठा विस्कळीत झाला होता. सदर परिस्थितीत नॅशनल हायवे ७५२ जी च्या मनमाड-येवला-कोपरगाव सेक्शनचे चे महत्त्व ठळकपणे जाणवले.
त्यामुळे येवला बायपाससह मनमाड-येवला-कोपरगाव रस्त्याचे चौपदरीकरण करण्यास मंजुरी देण्यात यावी असे मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!