ताज्या घडामोडी

शासन पुरस्कृत विषेश सहाय्य योजना लाभार्थी यांचे माहिती दि. 15 जुलै पासून डीबीटी अंतर्गत अपडेशन

विशेष सहाय्य योजना लाभार्थी यांचे माहिती दि. 15 जुलै पासून डीबीटी अंतर्गत अपडेशन

येवला : राज्य शासन पुरस्कृत विशेष सहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनांचे लाभार्थी यांची माहिती डीबीटी पोर्टलद्वारे भरण्यासाठी येवला तालुक्यातील एकूण ८ मंडळनिहाय दि. १५ ते दि. १९ जुलै दरम्यान स. १० ते ५ वाजेपर्यंत शिबीर आयोजित केले असल्याची माहिती तहसीलदार श्री. आबा महाजन व नायब तहसीलदार संगांयो श्री. विवेक चांदवडकर यांनी दिली.

लाभार्थ्यांनी शिबीर दरम्यान आधार अपडेट करुन घेऊन त्यानंतर आपल्या बँक खात्याला आधार संलग्न करावे. भविष्यात शासनाद्वारे डीबीटी प्रणालीद्वारे थेट योजनेचा लाभ बँक खात्यात वर्ग होणार असल्याने लाभार्थ्यांनी तातडीने आधार कार्ड व मोबाईल क्रमांक खात्याशी लिंक करावा.

■ लाभार्थ्यांनी अपडेट केलेले आधार कार्ड, राष्ट्रीय बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स व बँक खात्याला लिंक केलेला मोबाईल क्रमांक यासह शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

■ मंडळनिहाय संपर्क येवला- धीरेंद्र कातदान 9850345102, अंगणगाव – नवनाथ मोतीराम 9860432016, नगरसूल गणेश पाटील 9850345102, राजापूर लक्ष्मण काशिनाथ 9604415755, अंदरसूल नामदेव पगार 9423005570, पाटोदा गोरख सीताराम 9421600903, जळगाव नेऊर नवनाथ मोतीराम 9860432016, सावरगाव – श्रीमती खडे 9309139358

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!