ताज्या घडामोडी

हाक मराठी अर्बन निधि लि,नाशिक ने विनातारण कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक दोनशे हुन अधिकलोकांना ३४ लाखांहुन अधिक रुपयाचा गंडा; संचालक मंडळाविरोधात गुन्हा

विनातारण कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक

दोनशे हुन अधिक लोकांना ३४ लाखांहुन अधिक रुपयाचा गंडा; संचालक मंडळाविरोधात गुन्हा

नाशिक, विनातारण, विनासिबिल स्कोर, विना जामीनदारांशिवाय कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवून ‘हाक मराठी अर्बन निधी’ बँकेच्या कथित संचालक मंडळासह व्यवस्थापनाने २०४ जर्णाकडून ३४ लाख १६ हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी एका संशयितास आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली असून, अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित योगेश गुलाब पाटील यास अटक करण्यात आली आहे.

भूषण सुरेश वाघ, वर्षा हिराचंद्र पाटील, मेघा योगेश बागूल, मनिषा सुरेश पाटील, अमित अनंत बने, सुरेश विनायक पाटील, व्यवस्थापक चंद्रशेखर लक्ष्मण कडू, एकनाथ निवृत्ती पाटील, योगेश गुलाब पाटील आणि बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

दाखल करण्यात आला असून, गुन्हा शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. संशयित भूषण वाघ याने २०२२ ते मे २०२४ या कालावधीत सिडकोतील उत्तमनगर बसस्टॉप जवळ ‘हाक मराठी अर्बन निधी’ बँक सुरु केली. बँकेतील संशयित संचालक मंडळ, व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांनी संगनमताने बँकेचा नफा वाढविण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या. त्यानुसार होमगार्ड असलेले सोपान राजाराम

तक्रारी वाढण्याची शक्यता

• तक्रारदार शिंदे यांच्यासह २०४ नागरिकांची कर्ज मंजूरी प्रकरणात फसवणूक झाली आहे. येत्या काही दिवसांत तक्रारदार व फसवणुकीच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक समाधान चव्हाण हे तपास करत आहेत. पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरु असून आरबीआयचा बँक परवाना व कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

शिंदे (रा. नाणेगाव, ता. जि. नाशिक) यांना मोबाईलवर ‘ही बँक विनातारण, विनासिबिल स्कोर, विना जामीनदार पाच लाख रुपयापर्यंत कर्ज मंजूर करते’, असा मेसेज आला होता. तसेच कर्जावर व्याजदरही कमी असून ४५ दिवसात प्रोसेस पूर्ण करुन लोन देते’, असेही त्या जाहिरातीत म्हटलेले होते. शिंदे यांनी संशयित वाघ याच्या मोबाईलवर संपर्क साधून लोनची प्रोसेस व त्यासाठी लागणारा खर्च याची माहिती घेतली. शिंदे

यांना पाच लाखांचे कर्ज पाहिजे होते. त्यासाठी त्यांनी बँकेला संपर्क साधला असता त्यांना बँकेचे सभासदस्यत्व स्वीकारावे लागेल, असे सांगण्यात आले. सभासद फी १५०० रुपये, कर्जाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी २ हजार रुपये, इन्शुरन्ससाठी ३ हजार रुपये, व्हेरिफिकेशन फी १ हजार रुपये असे साडेसात हजार रुपयांचा खर्च, त्यानंतर वाघ याने संशयित वर्षा पाटील यांचा ऑनलाइन क्यूआर कोड शिंदे यांच्या व्हाटसअपवर पाठवून पैसे पाठविण्यास सांगितले. हे पैसे व इतर दहा हजार असे १७ हजार ५०० रुपये पाठवून बँकेचे पासबुक, प्रोजेक्ट रिपोर्ट संशयिताने शिंदे यांना पाठवून कर्ज मंजूर झाल्याचे पत्र पाठविले परंतु प्रत्यक्षात कर्जाची रक्कम दिली नाही. तसेच, खर्चाची रक्कमही न देता त्यांची फसवणूक केली. अशीच फसवणूक सुमारे २०४ जणांची करीत ३४ लाख १६ हजारांना गंडा घातला आहे.
तसेच येवला मालेगाव श्रीरापपुर वैजापुर,नाशिक नांदगाव ,नादेड ,सोलापुर चंद्रपुर ,यवतमाळ बिड,संभाजीनगर,औरंगाबाद,यासह अखंड महाराष्ट्रातील कर्जअर्जदार सभासद यांच्याकडुन फिक्स डिपाॅजिट ची रक्कम जमा करण्यास भाग पाडले व कर्ज ही दिले गेले नाहीत,उलट हाक मराठी अर्बन निधी ने सभासदांकडुन अवाजवी रक्कम वसुल करुनहाक मराठी अर्बन निधीस कुलुप लाउन फरार झालेले आहेत यात भुषण वाघ यास अटक झालेली आहेत ,त्या मुळे कर्जअर्जदार सभासद यांच्या मनात पैसे बुडण्याची भिती निर्माण झालेली आहेत..ज्याचा अर्थिक संकट सभासद यांच्यावर येउन थोपले आहेत..पोलीस प्रशासन योग्य दिशेने काम करत आहेत.यासाठी आर्थिक गुन्हेशाखा आयुक्तालय नाशिक येथिल पो.नि. श्री.समाधान चव्हान हे ईमाने ऐतबार ने सभासद कर्जअर्जदार यांची रक्कम परत ःमिळवुन देणेसाठीयोग्य ती कारवायी करुन योग्य दिशेने तपास करत आहेत तरी
सर्वाना एक विनंती आहे कि

आपण सर्व जन या जाळ्यात अडकलो आहोत, मला माहिती नाही किती जिल्ह्यात किती लोकांना या गोष्टी साठी त्रास झाला आहे, तरी अजून एकदा मी विनंती करतो कि महाराष्ट्र मधील सर्व जिल्यात या फसवणूक झाल्या आहेत तेथील कोणी कोणी किती लोक दिले आहेत, त्याची फक्त संख्या पाहिजे

जसे कि पुणे दक्षिण विभाग – 70 लोक

आशा प्रकारे सर्वांनी माहिती द्या जेणे करून मला पूढे कार्यक्रम करता येईल

या वरून ठराविक आकडा अपल्याला देता येईल कोणाचे नाव नाही येणार पुढे काळजी करू नका, फक्त जिल्या नुसार माहिती पूढे पाठविली जाणार आहे जेणे करून महाराष्ट्र सरकार सदरील जिल्यात एक पथक तयार करू शकेल आणि आपले मार्ग सोपे होतील तर फक्त आपला जिल्हा आणि संख्या पाठवा व प्रशासनास मदत करा

____________तसे नाही जर कोणतीही बँक अथवा फायनान्स कंपनी जर एखाद्या संस्थे मार्फत काम करत असेल तर तसे त्याचे बंध पत्र तयार होते, आणि ही संस्था योग्य आहे कि अयोग्य आहे याची दोन्ही पार्टी ची जबाबदारी असते जर त्यानी हे सर्व फक्त अंडरस्टँडिंग मध्ये केले असेल तर यांचा फायदा समोरील कंपनी ने सुद्धा घेतला आहे, आणि जर तुम्हांला सर्वाना प्रोजेक्ट रिपोर्ट प्रत आली आहे त्या वरती कोणत्याही आधीकृत सही किंवा स्टॅम्प नाही त्या मुळे या कंपनी सुद्धा कार्यवाही होणे बांधकारक आहे असे दिसून येते कि सांगणमंत ने केलेलं काम आहे जर प्रोजेक्ट रिपोर्ट देणाऱ्या संस्थे ने स्टॅम्प आणि CA सही नाही दिली यांचा अर्थ असा कि ते रिपोर्ट फसवे आहेत
_________जय महाराष्ट्र बंधू आणि भगिनी नो 🙏🏻

*महाराष्ट्र कर्ज घोटाळा सण 2022 ते 2024*

हाक मराठी अर्बन निधी लिमिटेड- नाशिक, महाराष्ट्र

या कंपनी मार्फत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विना तारण विना सिबिल कर्ज वाटप देतो म्हूणन सामान्य ग्राहक, कर्जदार, शेतकरी, व्यवसायिक, महिला, विद्यार्थी, या सर्वांची करोडो रुपये ची फसवणूक केली आहे.

कर्ज करून देतो म्हणून कंपनी संचालक यांनी सर्वांनी मिळून सर्व महाराष्ट्र मधील जनतेची फसवणूक करून ऑनलाईन आणि कॅश मार्फत कर्ज करण्यासाठी पैसे घेतले गेले आहेत.

या प्रकरणी सदरील कंपनी संचालक आणि अधिकारी यांच्या विरुद्ध नाशिक गुन्हे शाखा नाशिक मुख्यालाय, अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद होऊन हाक मराठी अर्बन निधी कंपनी चे संचालक यांना अटक करण्यात आली आहे,

तरी ज्या ग्राहक आणि सभासद, कर्जदार यांनी हाक मराठी अर्बन निधी लिमिटेड याचे संचालक आणि कंपनी वरती विश्वास ठेऊन, कर्ज काढण्यासाठी जर पैसे भरले असतील तर त्यानी *पोलीस मुख्यालंय आर्थिक गुन्हे शाखा पोलीस आयुक्त कार्यालय नासिक* येथे त्वरित संपर्क करावा, आणि जे कागद पत्र देण्यात आली आहे किंवा पैसे कसे दिली आहे, ती सर्व माहिती देण्यात यावी जेणे करून मा कोर्ट या संदर्भात निकाल देऊन हाक मराठी अर्बन कंपनी मार्फत करण्यात आलेली फसवणूक मधील ग्रहकांना पैसे परत मिळतील.

तरी सर्वाना विनंती आहे जागे व्हा आणि पुढाकार घ्या आपले पैसे आपले आहेत, आपले नातेवाईक किंवा मित्र कोणीही या प्रक्रिया मध्ये बळी पडले असतील तर होता होईल तेवढे पोलीस प्रशासन यांना सहकार्य करा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!