ताज्या घडामोडी

विनायक लोहार यांची विशेष कार्यकारी अधिकारी SEO म्हणून सांगली जिल्ह्यातून निवड

विनायक लोहार यांची विशेष कार्यकारी अधिकारी SEO म्हणून सांगली जिल्ह्यातून निवड

मिरज: प्रतिनिधी

विनायक लोहार हे गेली अनेक वर्ष समाजसेवेत आहेत ते भोसेगाव मिरज जिल्हा सांगली चे रहिवाशी असून मागील काही वर्ष मुंबई येथे कार्यरत होते त्यावेळेस आपल्या गावाकडून येणाऱ्या लोकांची ते सेवा करत होते त्यांना मंत्रालयात घेऊन जाणे त्यांचं काही काम असेल ते करून देणे गोरगरिबांची मोफत ऑपरेशन मुख्यमंत्री सहाय्यता निधी तून करून देणे, गावाकडील विकास कामांचा आढावा घेणे, गावातील अनेक सामाजिक, व धार्मिक जयंती उत्सव मध्ये पुढाकार घेऊन परवानगीसाठी प्रयत्न करणे अशा अनेक कामाचा त्यांचा लेखाजोखा पाहून त्यांना गेले काही दिवसापूर्वी SEO विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
ते सध्या पोलिस टाईम्स न्यूज 24 या चॅनेलला प्रतिनिधीचे पण काम पाहतात मुलाखतीमध्ये त्यांनी असे म्हटले या पदाचा नक्की मी गोरगरीब गरजू शालेय कामं करता जनतेसाठी वापर करीन.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!