ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…* *येवला नगरपालिका क्षेत्रात १५ कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…*

*येवला नगरपालिका क्षेत्रात १५ कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी*

*नाशिक,येवला,दि.१४ मार्च :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा योजनेतून येवला नगरपरिषद क्षेत्रात १५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये महात्मा फुले नाट्यगृहाचे आधुनिकीकरण,विद्युतीकरण आणि येवला शहरातील रस्ते काँक्रिटीकरण कामांचा समावेश आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला नगरपालिका क्षेत्रात विविध विकासकामे करण्यात येत असून विकासातून येवला शहराचा चेहरा मोहरा बदलला जात आहे. त्यांच्या माध्यमातून विविध २३ विकासकामांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


यामध्ये महात्मा फुले नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करण्यासाठी २ कोटी, महात्मा फुले नाट्यगृहाचे विद्युतीकरण करण्यासाठी २ कोटी २५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.तसेच सर्व्हे न. १२१/२ मधील ओपन स्पेस सुशोभीकरण व चारीवर कॉक्रीटीकरण करण्यासाठी ५० लाख, म्हसोबा नगर भागातील रस्ते गटारीसह कॉक्रीटीकरण करण्यासाठी ८० लाख, पारेगाव रोड ते नगर मनमाड राज्यमार्गा पर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण व डॉ. सोनवणे हॉस्पिटल ते मुख्य नाला भुयारी गटार करण्यासाठी करण्यासाठी १ कोटी ३० लाख, शेंद्री बारव ते शादी हॉल पावेतो रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी ३० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

येवला शहरातील पाटोदा रस्ता ते सोनवणे वस्ती पावेतो रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी ८० लाख, चांद फकीर मशिद ते सलीम चहावाले यांचे घरापर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यासाठी २५ लाख, मथुरा शिंदे नगर मधील योगेश खैरनार यांच्या घरापासून विघ्नहर्ता हॉस्पिटल पर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यासाठी ५० लाख, महात्मा फुले कॉलनी ते दिनेश महाजन यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी ५० लाख,श्रीराम कॉलनी येथील रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी ७० लाख,
श्रीराम कॉलनी केंगे बाबा घरापासून ते अनिल गोसावी घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी ५० लाख, स.न ८९ बाजीराव नगर भागातील रस्ते कॉक्रीटीकरण करण्यासाठी ५० लाख,देसाई ड्रीम सिटी जवळील खुली जागा विकसित करण्यासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर येवला शहरातील श्रीराम कॉलनीतील सर्व्हे न १०८ रमेश शिंदे यांच्या घरापासून ते जगन काबरा यांच्यापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण, सटवई गल्ली येथील रस्त्याचे कॉक्रीटीकरण,जुना नगरपालिका रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ७० लाख,राजू मिमी ते सादिक कुरेशी यांचे घरापर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यासाठी २५
लाख, भगवान साबळे ते रंगनाथ पुरे यांचे घरापर्यंत भूमिगत गटारीसह रस्त्याचे कॉक्रीटीकरण, पारेगाव रोड भागातील स्वामी समर्थ मंदिर भागातील रस्ते गटारीसह कॉक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख, मुश्ताक चमन ते यकीलशेठ गाझी यांचे घरापर्यंत भूमिगत गटारीसह रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यासाठी १५ लाख, जुर अहमद ते अकिलभाई जरीवाले यांचे घरापर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यासाठी १५ लाख, अखतामर चिचा ते सैय्यद बाबा चौक यांचे घरापर्यंत भूमिगत गटारीसह रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यासाठी २० लाख असे एकूण १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या कामाला लवकरच सुरुवात होऊन शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!