ताज्या घडामोडी

*एम.एस.जी.एस.शिक्षण संकुलात स्व.अ‍ॅड.सुभाषराव सोनवणे यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली.

*एम.एस.जी.एस.शिक्षण संकुलात स्व.अ‍ॅड.सुभाषराव सोनवणे यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल, सेमी इंग्लिश व ज्यु.कॉलेजमध्ये अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे मा.सरचिटणीस स्व.अ‍ॅड.सुभाषराव (आण्णा) सोनवणे यांना तृतीय पुण्यतिथी निमित्त आदरांजली देण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्व.अ‍ॅड.सुभाषराव (आण्णा) सोनवणे यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना व अण्णांचा जीवन परिचय शिक्षक अमोल आहेर यांनी उपस्थितांना करून दिला.यानंतर इ.९ वीची विद्यार्थिनी प्रणिता कचरे हिने भाषण व कविता तसेच शिक्षिका शोभा निकम यांनी आण्णाजींच्या कार्यावर स्वरचित *’पितासम आण्णा’* कविता सादर केली.
अध्यक्षीय भाषणांत अरुण भांडगे यांनी स्व.अ‍ॅड.सुभाषराव सोनवणे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे,सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक व प्रशासकीय अधिकारी प्रा.आर.बी. गायकवाड़, जीवन गाड़े, उज्ज्वल जाधव, आकाश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, जनार्दन जानराव, अंदरसुल ग्रामपालिका माजी सरपंच व विद्यमान सदस्या विनिताताई सोनवणे, रामनाथ काका एंडाईत, केशव सोनवणे, बाबासाहेब सोनवणे, संदीप वाकचौरे, संदीप परदेशी, ज्यु.कॉलेजचे प्रिंसिपल सचिन सोनवणे, इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ खान, सेमी इंग्लिशच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, गणेश सोनवणे, पारस भगत, अजीम पटेल, राजेश कांबळे, सचिन घोडके, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, नीलिमा देशमुख, सुनीता वडे, पूजा गायकवाड, इकरा अन्सारी, सायली भालेराव सह सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!