ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.*

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील वरिष्ठ मराठी शिक्षिका सुष्मिता देशमुख या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले.आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. शाळेतील इ. ८वीच्या विद्यार्थिनी मधुरा आहेर, सानिध्या ढोले, श्रद्धा आवारे तसेच शिक्षिका शर्मिला पवार, शिक्षक अमोल आहेर व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुष्मिता देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी प्रिन्सिपल अल्ताफ खान, गणेश सोनवणे, दीपक खैरनार, अजीम पटेल, पारस भगत, राजेश कांबळे, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, सुनीता वडे, मोनिका कळांगे सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शोभा निकम यांनी केले तर आभार शिक्षिका पूजा गायकवाड यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!