ताज्या घडामोडी

प्रत्येक विभागाने प्रलंबित कामे वेळेत पुर्ण करावीत* :*अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ* *येवला येथे विविध कामांची आढावा बैठक संपन्न* *मालेगाव, दि. 24 फेब्रुवारी, 2024

वृत्त क्र. 23 दिनांक : 24 फेब्रुवारी,2024

*प्रत्येक विभागाने प्रलंबित कामे वेळेत पुर्ण करावीत*
:*अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ*
*येवला येथे विविध कामांची आढावा बैठक संपन्न*
*मालेगाव, दि. 24 फेब्रुवारी, 2024 (उमाका वृत्तसेवा):*
येवला व निफाड तालुक्यात सुरु असलेले विकासकामे विविध विभागाच्या माध्यमातून सुरु आहेत. त्याअनुषंगाने त्या त्या संबंधित विभागाने कामे प्रलंबित न ठेवता त्यास आवश्यक त्या प्रशासकीय बाबी पुर्ण करुन कामे वेळेत पुर्ण करावीत, अशा सुचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित विभागांना दिल्या.

आज येवला येथील संपर्क कार्यालयात येवला तालुक्यातील विभागनिहाय विविध कामांची आढावा बैठक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी किरण देशमुख,गटविकास अधिकारी सुहास शिंदे,नांदुर मध्यमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौळे, मनमाड महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, चांदवड विभागाचे महावितरणचे कार्यकारी अभियंता काळू माळी,महाराष्ट्र जीवन प्राधिकारणचे उपअभियंता अजय चौधरी,ए.बी.चव्हाण,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अभिजित शेलार, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक,भास्कर शिंदे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाई भासू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येवून मागणीनुसार टँकर उपलब्ध करुन देण्यात यावीत, अशा सुचना यावेळी संबंधित विभागाला मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या. तसेच शासनाच्या शबरी आवास योजना, रमाई आवास योजना व मोदी आवास योजनांचा लाभ शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना मिळण्यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करुन एकही पात्र लाभार्थी या योजनांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सुचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या.

ते पुढे म्हणाले येवला शहरात स्वच्छता अभियान मोठया प्रमाणात राबविण्यात यावे. आपला परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्याने प्रयत्न करावे. तसेच कचरा नेण्यासाठी घंटागाडी नियमित येण्यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष घालण्याच्या सुचना यावेळी मंत्री भुजबळ यांनी दिल्या. तसेच कायदा सुव्यस्थेच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित राहतील याकडे संबंधित विभागाने दक्ष राहण्याच्या सुचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या. यावेळी विविध विभागातील अधिकाऱ्यांनी विभागाच्या माध्यमातून सुरु असलेले कामे व प्रलंबित कामांची सविस्तर माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. सर्व विभागांनी आपआपली विभागाची कामे वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित अधिकऱ्यांना दिल्या.

*अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला येवला व निफाड तालुक्यातील विविध कामांचा आढावा*
हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबी अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 करिता 25% आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना वितरित करणेबाबत, प्रधानमंत्री पीक विमा योजना -claim केलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वितरित करणे बाबत, नोव्हेंबर 2023 अवकाळी पाऊस बाधित शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान वाटप,जून २०२३ च्या खरीप हंगामामधील दुष्काळाच्या अनुषंगाने शासकीय मदतीच्या वाटपाचा आढावा, टंचाई परिस्थितीचा आढावा, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची स्थिती, टँकरबाबत संभाव्य मागणी, येवला शहर पिण्याच्या पाण्याची स्थिती, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत येवला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना प्रस्तावाची सद्यस्थिती, येवला शहरातील स्वच्छता, येवला व ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तलावातील पाण्याची स्थिती, येवला व ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशन मधील रेट्रोफिटिंग योजनेच्या कामाची स्थिती, राजापूर व ४० गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची स्थिती,धुळगाव व १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची स्थिती, विंचूर लासलगाव १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची स्थिती,महावितरणकडील विविध प्रश्नांचा आढावा, RDSS योजनेमधील कामांचा आढावा,चिचोंडी औद्योगिक वसाहत ता.येवला येथे 5MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र सुरू करणे, पिंपळगाव जलाल ता.येवला 5MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र सुरू करणे,बल्हेगाव ता.येवला 5MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र सुरू करणे, कुसूर ता.येवला 5MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र सुरू करणे, सोमठाण देश ता.येवला 5MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र सुरू करणे,जऊळके ता. येवला 5MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र सुरू करणे, येवला शहर विद्युत उपकेंद्र 5MVA चे अतिरिक्त रोहित्र बसविणे,कोटमगाव विद्युत उपकेंद्र 5MVA चे अतिरिक्त रोहित्र बसविणे,खडकमाळेगाव ता.निफाड 5MVA चे अतिरिक्त रोहित्र बसविणे, मऱ्हळगोई खुर्द ता.निफाड 5MVA चे अतिरिक्त रोहित्र बसविणे, महावितरण ACF मधील सुरु असलेल्या कामांचा आढावा, अंगुलगाव ता.येवला 5MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र कामाची स्थिती, नगरसूल ता.येवला येथील 5MVA चे अतिरिक्त रोहित्र बसविणे,पाटोदा ता.येवला या परिसरात १३२/३३ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र (EHV Substation), स्थापन करणे, येवला शहर कार्यालयातील ग्रामीण भागाचे विभाजन करून अतिरिक्त एक नवीन कक्ष, उपविभाग स्थापन करणे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजनेमधील कामांचा आढावा, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांचा आढावा,पुणेगाव दरसवाडी कालवा कामांचा आढावा,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज प्रकरणांना मंजुरी,कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आदी कामांविषयी विभागानिहाय आढावा घेण्यात आला

0000000

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!