ताज्या घडामोडी

आंदोलनाची पुढील दिशा जाहीर*

*आंदोलनाची पुढील दिशा जाहीर*

*१. २४ फेब्रुवारीपासून मराठ्यांचे राज्यभर “आदर्श रास्तारोको” आंदोलन सुरु होणार.*

*२. प्रत्येक मराठ्याने आपापल्या गावाची/शहराची जबाबदारी सांभाळावी.*

*३. सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी. यासाठी हे आंदोलन असेल.*

*४. आंदोलनाची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १:०० आणि सायंकाळी ४:० ते ७:०० असेल.*

*५. या वेळात गावातील सर्व मराठे रस्त्यावर येऊन ठाण मांडतील. आंदोलन दररोज आणि बेमुदत काळासाठी असेल.*

*६. आंदोलन शांततेत होईल परंतु एकही गाडी पुढे जाणार नाही.*

*७. राजकीय नेत्यांना (जि.परिषद सदस्य, सभापती आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री) यांना यापुढे मराठे दारात येऊ देणार नाहीत.*

*८. परीक्षेचा काळ सुरु आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर व घरी जाण्यास त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.*

*९. गावातील मुख्य रस्ता कोणताही असो, जिल्हामार्ग, राज्यमार्ग किवा राष्ट्रीय महामार्ग. आंदोलन काळात सर्व रस्ते बंद राहतील.*

*१०. १ मार्चला अंतरवाली सराटी येथे सर्व आजी-माजी मराठा आमदार खासदार मंत्री यांची बैठक होणार. सगेसोयरे बद्दल काय भूमिका घेतात, यावरून तो नेता मराठ्यांच्या बाजूने की विरोधात हे समाज ठरवणार.*

*११. ३ मार्चला जिल्ह्याच्या ठिकाणी एकच मोठा रास्ता रोको होणार. या रास्तारोकोला जिल्ह्यातील मराठा बांधव लाखोंच्या संख्येने जमणार.*

*१२. निवडणूक जवळ आली आहे. प्रचारासाठी एकही गाडी गावात येणार नाही. आली तर परत जाणार नाही.*

१३. *२४ तारखेपासून महाराष्ट्र शांततेत जागेवर ठप्प असेल.*

*🚩मराठामार्ग*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!