ताज्या घडामोडी

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या झंजावाती निर्णयामुळे नाशिककरांसह गोदामाई भक्तांना दिलासा!* *गोदा आरतीसाठी राज्य शासनाकडून ११ कोटी ७७ लाख निधी तातडीने वितरित*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या झंजावाती निर्णयामुळे नाशिककरांसह गोदामाई भक्तांना दिलासा!*

*गोदा आरतीसाठी राज्य शासनाकडून ११ कोटी ७७ लाख निधी तातडीने वितरित*

मुंबई / नाशिक, दि. १७ फेब्रुवारी २०२४ :

नाशिकची सांस्कृतिक ओळख नव्याने बळकट करणाऱ्या “गोदा आरती” उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठीचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला आज वितरित केल्याने सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वेगवान निर्णयक्षमतेची आणि झंजावाती कारभाराची चुणुक नाशिककरांसह गोदामाई भक्तांसमोर अधोरेखित झाली आहे.

वाराणशी, हृषीकेश व हरिद्वारच्या जगप्रसिद्ध गंगा आरती प्रमाणेच दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या आणि श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिक येथील पवित्र गोदावरी नदीच्या आरतीचा देखील कायमस्वरूपी उपक्रम सुरू करण्याची संकल्पना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. यासाठी एक स्थानिक समिती गठित करण्यात येऊन मुंबई आणि नाशिक येथे संबंधितांसोबत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठका घेतल्या होत्या.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ११ कोटी ७७ लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली असून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला आहे.

दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नाशिक दौऱ्यामध्ये त्यांनी गोदा आरती प्रस्तावाची आढावा बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.
त्या नंतर त्यांनी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत त्यांनी दिलेल्या सूचनांसंदर्भात प्रगतीचा आढावा घेतला होता.

जिल्हाधिकारी नाशिक यांनी दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक शासनास सादर केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ६ फेब्रुवारी रोजी श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी “आझादी का अमृत महोत्सव कोअर समिती”ची बैठक आयोजित करून गोदा आरती सुरू करण्यासाठीच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली होती.

जिल्हाधिकारी नाशिक यांनी त्यानंतर अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देऊन दिनांक 14 फेब्रुवारी रोजी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रस्तावास तात्काळ मान्यता देत निधी उपलब्ध करून वितरितही केला आहे. त्यामुळे आता गोदा आरती साठी आवश्यक पायाभूत सोई सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाराणसी, हृषीकेश व हरिद्वारची गंगा आरती आणि उज्जैनच्या नर्मदा आरतीच्या धर्तीवर नाशिकमध्ये देखील “गोदा आरती” सुरू व्हावी अशी सर्व नाशिककर नागरिकांची इच्छा होती. त्याप्रमाणे ही संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनासमोर मांडली होती.

आता पायाभूत सोयींसाठी मागितलेला सर्वच निधी उपलब्ध झाल्याने गोदा आरतीसाठी अकरा प्लॅटफार्म तयार करणे, भाविकांना बसण्यासाठी गॅलरी, हायमास्ट, तसेच एलईडी आणि विद्युतीकरण आदी कामे वेगाने करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वेगवान निधी वितरणासाठी जिल्हा प्रशासन तसेच श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नाशिक यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते.
मात्र गोदा आरती प्रस्तवाचा दिनांक 29 जानेवारी ते 17 फेब्रुवारी असा प्रवास पाहता अवघ्या 20 दिवसात प्रस्ताव तयार करणे पासून निधी उपलब्ध करून देणे ही प्रक्रिया पार पडली आहे. राजकीय नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले तर प्रशासकीय प्रक्रिया सुद्धा किती गतिमान आणि कार्यक्षम होऊ शकते याचा प्रत्यय ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिककर जनतेस आणून दिला आहे.

*प्रस्तावाच्या वाटचालीचा आढावा*

29 जानेवारी 2024 – नाशिक येथे गोदा आरती संदर्भात सर्व संबंधितांची आढावा बैठक

1 फेब्रुवारी 2024 – दिनांक 29 जानेवारी रोजी दिलेल्या सूचनांच्या पूर्तता संदर्भात आढावा घेण्यासाठी ऑनलाईन बैठक.

5 फेब्रुवारी 2024 – जिल्हाधिकारी नाशिक यांचे कडून अंदाजपत्रक शासनास सादर.

6 फेब्रुवारी 2024 – “आझादी का अमृत महोत्सव कोअर कमिटी” ने जिल्हाधिकारी यांच्या प्रस्तावास मान्यता दिली.

15 फेब्रुवारी 2024 – जिल्हाधिकारी नाशिक यांचे कडून निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर.

17 फेब्रुवारी 2024 – शासनाकडून निधी वितरणासाठी मान्यता प्राप्त / निधी वितरित

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!