ताज्या घडामोडी

*साईरोड लातुर या रस्त्याच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात उपोषण!* रस्ता एकच मात्र बिल उचलले दोनदा? *गुत्तेदार व अभियंता यांनी संगनमत करून कोट्यावदीचा केला अपहार*

*साईरोड लातुर या रस्त्याच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात उपोषण!*
रस्ता एकच मात्र बिल उचलले दोनदा?
*गुत्तेदार व अभियंता यांनी संगनमत करून कोट्यावदीचा केला अपहार*
नांदेड प्रतिनिधी:
लातूर जिल्ह्यातील धानोरा दिघोळ देशमुख पोहरेगाव आरजखेडा साई लातूर या रस्त्याचे दोन कोटीचे काम ए.बी.डोंगरे अँड कंपनी अंबाजोगाई या गुत्तेदाराला रस्त्याचे काम देण्यात आले होते. परंतु काम अर्धवट करून दिनांक 20 मे 2023 रोजी काम पूर्ण करण्यात आले आहे असे बोर्ड काही दिवसा अगोदर लावण्यात आले आहे त्याच रस्त्यावर पुन्हा दिनांक 16 जानेवारी 2024 च्या पत्रानुसार 3 कोटी 31 लाख 24 हजार 984 रुपयेचे काम मंजूर करण्यात आले आहे सदरील दुसरे काम मे.प्रवीण कंन्ट्रक्शन शिवसाई प्लाझा औसा रोड लातूर यांना देण्यात आले आहे एकच कामावर पहिल्यांदा दोन कोटी मंजूर करून तो काम अर्धवट करून पूर्ण बिल उचलण्यात आले सदर काम पूर्ण न करताच त्याच रस्त्यावर डबल दुसऱ्यांदा तीन कोटी पेक्षा जास्त रक्कम मंजूर करून शासनाला धोका देऊन जनतेची फसवणूक करीत आहेत सदरील भ्रष्टाचारामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर चे कार्यकारी अभियंता निळकंठ व उपविभागीय अभियंता रोहन जाधव, शाखा अभियंता भास्कर कांबळे व गुत्तेदार ए.बी.डोंगरे व प्रवीण कंट्रक्शन लातुर या सर्वांनी संगणमत करून कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला आहे सदरील कामाची गुण नियंत्रण पथकामार्फत चौकशी व्हावी आणि या कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील समिती नेमून अर्जदारांना सोबत घेऊन सदर कामाची चौकशी करावी व दोषी आढळणाऱ्या वर कारवाई करावी जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा आमरण उपोषण चालणार आहे.
दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2:00 वाजे पासून मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड येथे बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे व उपोषणातील ज्या मागण्या आहेत ते 1)सदरील कामाचे गुण नियंत्रण पथकामार्फत मार्फत चौकशी व्हावी 2) ए.बी डोंगरे कंपनी अंबाजोगाई या कंपनीचा परवाना रद्द करून काळी यादी टाकावे 3) अभियंता कांबळे भास्कर, उपविभागीय अभियंता रोहन जाधव, कार्यकारी अभियंता निळकंठ यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबित करावे 4) सदर कामाचे आजपर्यंत गुत्तेदाराला जे बिल रक्कम देण्यात आली आहे ती रक्कम व्याजासह वसूल करून शासन दरबारी जमा करावे अशी मागणी घेऊन अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी व अविनाश पवार साई यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करण्यात येत आहे उपोषण कर्ते अल्पसंख्यांक मराठवाडा अध्यक्ष शेख अजीम व इतर पदाधिकारी उपोषणात सहभागी आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!