ताज्या घडामोडी

मनोहर देसले [पोलीस टाईम्स न्यूज ] पिंपळगाव बसवंत

मनोहर देसले [पोलीस टाईम्स न्यूज ] पिंपळगाव बसवंत
मी सध्या गुन्हे अन्वेषण विभाग
नाशिक DTS या ठिकाणी [ basic understanding Marathi language ]हा विषय शिकवण्यासाठी जात होतो .तेथे युपी, बिहार, झारखंड, छत्तीसगड असे विविध राज्यांतील जवळपास 338 विद्यार्थी प्रशिक्षण घेत होते . विद्यालयाचे प्राचार्य मा.अशोक नखाते साहेब [S.P.]यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारचे प्रशिक्षण संबंधित अधिकारी वर्ग प्रशिक्षण देत होते . आणि त्यांच्यापैकीच हा विद्यार्थी…याने दिनांक 22 जानेवारी रोजी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले कर्तव्य बजावत असताना अचानक एक प्रवासी खाली कोसळल्याचे पाहून वरील विद्यार्थ्यांने तत्काळ बघ्यांची गर्दी बाजूला करून आयुष कुशावह या विद्यार्थ्यांने सदर व्यक्तीला 10 मिनिटा पर्यंत CPR देत राहीला याचा परिणाम सदर व्यक्तीला या जवानामुळे जीवदान मिळाले… नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालया व प्रशिक्षण देणाऱ्या सर्व अधिकारी वर्ग यांच्यासाठी ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.सदर विद्यार्थ्यांचे सर्व अधिकारी वर्ग यांनी कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!