ताज्या घडामोडी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती* च्या वतीने मतीमंदाना *मोफत ब्लॅंकेट व औषधांचे वाटप*”

“*अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती* च्या वतीने मतीमंदाना
*मोफत ब्लॅंकेट व औषधांचे वाटप*”

बेरू मतिमंद प्रतिष्ठान , बदलापूर येथे शनिवार
दि 13 जानेवारी 2024 रोजी भेट देऊन *अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती* च्या वतीने व रोटरी क्लब च्या विशेष सहकार्याने मकरसंक्रातीनिमीत्त मतिमंदाना मोफत ब्लॅंकेट व औषधांचे वाटप आमचे मित्र *श्री विजू पुजारी* यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती चे राष्ट्रीय सचिव *श्री कृष्णा कवठणकर* व महाराष्ट्र सचिव *श्री प्रभाकर गायकर* यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला. आमचा मित्र प्रमोद सावंत ह्याचा मतिमंद मुलगा
मयूर सावंत (वय 33 वर्षे) हा गेल्या 22 वर्षांपासून ह्या आश्रमात रहात असून त्याची कहाणी उपस्थितांना सांगताना प्रमोद ला त्याचे अश्रू अनावर झाले. प्रमोद च्या मतिमंद मुलाच्या प्रेमा पोटी आम्हाला बदलापूर येथील बेरू मतिमंद आश्रमात भेट देऊन मतिमंदाच्या जीवनातील भयाण वास्तव जाणण्याची संधी मिळाली. आयुष्य जगण्याची त्यांची धडपड पाहता आम्ही सर्वच फार व्यथित झालो.

प्रकृतीने त्यांना जरी अपंगत्व दिले असले तरी ही एक गुण सर्वसाधारण मुलांपेक्षा त्यांच्यात जास्तच दिसून आले हे कुमारी *अरुंधती* ह्या अनाथ असलेल्या मतिमंद मुलीने काढलेल्या विविध चित्रकलेच्या कृतीवरून आम्हाला जाणवले. त्या निरागस मुलीची ही कला पाहून भावूक झालेल्या श्री विजू पुजारी ह्यांनी तिचे पालकत्व स्वीकारून तिचा पुढील सर्व खर्च हे ते करणार असे जाहीर करून सुखद धक्का दिला आणि मयूर सावंत ची ही मासिक फी मोफत करण्याकरिता मित्रांच्या सोबतीने प्रयत्न करणार असे ही जाहीर केले तसेच श्री राजेश परब व विजू पुजारी ह्यां दोघांनीही पुढील एक वर्षाची मतीमंदाना लागणारी सर्व औषधे मोफत देण्याकरिता विशेष प्रयत्न करणार असे जाहीर केले. विजू पुजारी व विजय तलकोकुल ह्यांनी आश्रमास आर्थिक देणगी ही दिली.

सदर कार्यक्रमास रोटरी क्लब चे प्रेसिडेंट श्री महेंद्र माधानी हे सपत्नीक हजर होते. तसेच अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती चे मुंबई कार्याध्यक्ष श्री रवी शंकर मिश्रा, मुंबई सचिव श्री राजेश परब, चांदीवली विधानसभा उपाध्यक्ष श्री प्रमोद सिंग आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी व आमचे मित्र परिवार हजर होते.

आश्रमात सर्वत्र चांगली साफसफाई ठेवणे, मतीमंदाची कुटुंबप्रमुख या नात्याने विशेष काळजी घेणे , फिजीओ थेरपी रूम मध्ये मतीमंदाना उपचार देणे, उत्कृष्ठ जेवण देणे अश्या विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या व विशेष करून कोविड काळात मतीमंदाची आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेणाऱ्या बेरू मतीमंद प्रतिष्ठान च्या संचालिका *श्रीमती सुलोचना बेरू* यांचा ही अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती तर्फे सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरव केला. प्रतिष्ठान च्या वतीने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती च्या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे सदर स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!