ताज्या घडामोडी

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात लुटला पतंग उत्सवाचा आनंद*

VIKAS BHAU BHUJBAL: *मकरसंक्रांतीच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात लुटला पतंग उत्सवाचा आनंद*

*जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार – मंत्री छगन भुजबळ*

*संक्रांतीच्या निमित्ताने नाही मात्र येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्कीच कापू – मंत्री छगन भुजबळ*

*नाशिक,येवला,दि.१५ जानेवारी:-* आकाशात झेपावनारे पतंग हे अधिक उंचावर गेले पाहिजे. हे सर्व आपल्यालाच लोकांचे पतंग आहे. हे पतंग कापण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र येणाऱ्या निवडणुकीत जे आपल्या समोर जे विरोधक असतील त्यांचा पतंग या मतदारसंघातील जनतेच्या बळावर नक्कीच कापू अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आज येवला येथे आयोजित पतंग उत्सवास मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी उपस्थित नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी पंचायत समती सदस्य मोहन शेलार, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, मकरंद सोनवणे,
अल्केश कासलीवाल, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुभाष गांगुर्डे, गोटु मांजरे, सुमित थोरात, विशाल परदेशी, सचिन सोनवणे, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या निवडणुकांमध्ये अनेक लोक आपल्या विरोधात उभे राहिले होते. येवल्याच्या जनतेने मात्र त्यांचा दोर कापला आहे. येणाऱ्या निवडणुकीत ज्यांची इच्छा आहे. त्यांनी विरोधात लढावं. मतदारसंघातील जनता त्यांना घरचा रस्ता दाखवतील असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून तिळगुळ वाटप करत पदाधिकाऱ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा*

मकर संक्रातीच्या निमित्ताने आज येवला येथील कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तिळगुळ वाटप करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चित्रकार संतोष राऊळ यांनी मंत्री छगन भुजबळ यांना त्यांचे चित्र रेखाटलेला पतंग भेट दिला.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!
मकर संक्रांतीचा हा सण तुमच्या आयुष्यात आनंदाची, सुखाची आणि भरभराटीची चाहूल देणारे आनंददायी संक्रमण घेऊन येवो.
सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!