ताज्या घडामोडी

*न्यू पेन्शन स्कीमच्या विरोधात* *नॅशनल रेल्वे मजदूर* *युनियन नाशिक रोड* *शाखेच्या वतीने रेल्वे कर्मचाऱ्यांचे* *उपोषण*

*न्यू पेन्शन स्कीमच्या विरोधात* *नॅशनल रेल्वे मजदूर* *युनियन नाशिक रोड* *शाखेच्या वतीने रेल्वे कर्मचाऱ्यांचे* *उपोषण* . *भारती धिंगान (प्रतिनिधी)* *नाशिक* . येथील मध्य रेल्वे च्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियन नाशिक रोड शाखेच्या वतीने तसेच महामंत्री काँम. वेणू पी. नायर यांच्या आदेशाने नाशिक रोड रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म नंबर 4 वर रेल्वेचे विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी न्यू पेन्शन स्कीमच्या विरोधात तसेच जुनी पेन्शन स्कीम लागू करावी या उद्देशाने भारतीय रेल्वे विभागाच्या मंडळ रेल प्रबंधक भुसावळ व भारत सरकार यांना आपली मागणी मान्य करावी म्हणून उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषण कर्ते कॉम्रेड कुंदन महापात्रा (सेक्रेटरी, नाशिक रोड ओपन लाईन) युवा नेते संदीप घुले, राजेश बडगे, मुकुंद शिंदे, अमोल ठोंबरे, अजय ढिंगिया, सुनील देवरे, सुनील ब्राह्मणे, संजय बेनके, नितीन चव्हाण, कैलास वाघ, तसेच इतर कर्मचारी उपोषणास सहभागी होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!