ताज्या घडामोडी

मनोज जरांगे आणि छगन* *भुजबळ यांनी वाद मिटवावा* *नाहीतर मला वाद* *मिटविण्यास यावे लागेल –* *केंद्रीय राज्यमंत्री* *रामदास आठवले*

*मनोज जरांगे आणि छगन* *भुजबळ यांनी वाद मिटवावा* *नाहीतर मला वाद* *मिटविण्यास यावे लागेल –* *केंद्रीय राज्यमंत्री* *रामदास आठवले*

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मी खरा शिष्य-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
*भारती धिंगान (प्रतिनिधी)* *नाशिक*
दि.6 – एक काळ असा होता की अनेक जाती स्वतःला मागास मानण्यास आणि आरक्षण मागण्यास तयार होत नसत.मात्र आता आरक्षणाचे महत्व सर्वाना पटत आहे.मराठा समाजाने आता आहे त्या ओबीसिंच्या आरक्षणातून आरक्षण मागू नये तर ओबीसी मध्ये स्वतंत्र प्रवर्ग करून ओबीसी म्हणूनच आरक्षण घ्यावे.मराठा समाजातील।ज्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे अशा गरीब मराठा समाजाला आरक्षण पाहिजे हीच मनोज जरांगे यांची मागणी आहे आणि त्या मराठा आरक्षण मागणीला आमचा पाठिंबा आहे.मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांनी वाद मिटविला पाहिजे.महाराष्ट्रात सर्व समाजात सहिष्णुता आहे. वाद होणे योग्य नाही.जरांगे आणि भुजबळ यांनी वाद मिटवावा नाहीतर मला येऊन त्यांचा वाद मिटवावा लागेल असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 67व्या महापरिनिर्वाणदिनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित जाहीर अभिवादन सभेत ना रामदास आठवले बोलत होते

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नेहरू मंत्रिमंडळात कायदा मंत्री होते त्याकाळात त्यांनी मी जरी काँग्रेस सोबत युती केली असली तरी मी कणखर आहे काँग्रेस च्या नदीत ढेकळा सारखे विरघळणार नाही असे म्हंटले होते त्यामुळे मी सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा शिष्य आहे.मोदींसोबत असलो तरी माझ्या हाती निळा झेंडा आहे.मी कणखर असून ढेकळासारखा विरघळणार नाही . लोकसभेत आर पी आय चा
एकही खासदार नाही तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मला केंद्रीय मंत्री मंडळात घेतले आहे .मी संसदेत जयभीम चा नारा बुलंद केला आहे असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.
शेतकाऱ्यांचे कर्ज माफ केले तसे मागसावर्गीयां चे कर्ज शासनाने माफ करावे अशी मागणी यावेळी ना रामदास आठवले यांनी केली.

येत्या दि 16 डिसेंम्बर रोजी आयोजित जागतिक धम्मपरीषदेत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!