ताज्या घडामोडी

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामास सुरुवात* *पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामाचे दिलीप खैरे यांच्या हस्ते भूमिपूजन*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामास सुरुवात*

*पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामाचे दिलीप खैरे यांच्या हस्ते भूमिपूजन*

*येवला,दि.६ डिसेंबर :-* राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामास २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामास कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते आज या कालव्याच्या अस्तरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, प्रकाश वाघ, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, कर्णा चव्हाण, अंबादास पगार ,रवींद्र शेलार सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, मलिक मेंबर, सम्राट बंदरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील सिंचन वाढून दुष्काळ दूर होण्याच्या दृष्टीने मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे येणारे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगाव पर्यंत पोहचण्यासाठी पुणेगाव व डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. यासाठी २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामास आज शुभारंभ करण्यात आला आहे.

पुणेगाव ते दरसवाडी कालवा विस्तारीकरण, अस्तरीकरण कामात एकूण ६३ किमीसाठी ९६ कोटी इतक्या निधीची तरतूद आहे. तर दरसवाडी ते डोंगरगाव एकूण ८७ किमी अंतर.विस्तारीकरण, अस्तरीकरण करण्यासाठी १४६ कोटी ८३ लक्ष रुपये मंजूर आहेत.

पुणेगाव ते दरसवाडी या ९६ कोटी च्या कामात अस्तरीकरण, काँक्रीटीकण, पुल , कालव्याखालून जाणारे पाणी यासाठी एचपीडी सुविधा, नदीवरील पूल, कालव्यास गरजेनुसार संरक्षक भिंत, गेट, आदी कामांचा समावेश आहे. या कामास सुरुवात करण्यात आली असून ३७ किमी ते ६३ किमी येथे मशीनने कालवा लेव्हल काम सुरू आहे. या कामासाठी कर्मचारी कॅम्प आणि प्लॅन्टचे काम सुरू आहे.

तर दरसवाडी ते डोंगरगाव या ८७ किमी च्या कामात विस्तारीकरण,काँक्रीटीकरण सह कातरणी शिवारात ३ पुल, बाळापुर ,सावखेडे, कुसमडी,नगरसुल,न्याहारखेडे, अंगुलगाव,तळवाडे या गावांच्या शिवारात मागणीप्रमाणे प्रत्येकी १ पुल,कुसुर ,हडपसावरगाव,वाईबोथी या गावांच्या शिवारात प्रत्येकी २ पुल, वाईबोथी, व न्याहारखेडे येथील नदीवरील ये जा करण्यासाठीचे मोठे २ पुल , बंधारे भरण्यासाठीचे गेट व अनेक लहान कामे यात घेतलेले आहेत. या कामास सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होऊन सिंचन क्षेत्रात अधिक वाढ होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!