ताज्या घडामोडी

*केंद्र शासनाच्या निर्यात बंदीच्या विरोधात शेतकऱ्यांनी अडवला मुंबई आग्रा हायवे* *संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात दिल्या घोषणा*

*केंद्र शासनाच्या निर्यात बंदीच्या विरोधात शेतकऱ्यांनी अडवला मुंबई आग्रा हायवे*
*संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात दिल्या घोषणा*
पोलीस टाईम्स न्यूज: सुनिलआण्णा सोनवणे


*चांदवड* : केंद्र शासनाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, यांचे दि.07/12/2023 रोजीचे अधिसुचनेनुसार कांद्याच्या निर्यात धोरणात सुधारणा करुन दि.31/03/2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे आज दि. 08/12/2023 रोजी आज अचानक कांद्याचे बाजार भाव पडल्याने व शेतकऱ्यांना उत्पादनावर आधारित बाजार भाव मिळत नसल्याने चांदवड बाजार समितीत शेतक-यांनी अचानकपणे आक्रमक होऊन कांदा मार्केट बंद पाडुन जनआंदोलन केले आहे. यात आक्रमक होत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद करून कृषी उत्पन्न बाजार समिती पासून धाव घेत मुंबई आग्रा हायवे गाठला व या ठिकाणी सुमारे दीड तास रस्ता रोको आंदोलन केले चांदवड तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले परंतु काही आक्रमक शेतकऱ्यांनी सदर आंदोलन चालू ठेवून थोडा काळ प्रशासनाची चिंता वाढवण्याचे काम केले परंतु पोलीस प्रशासनाने दंगा नियंत्रण पथक बोलून सदर आंदोलन थांबवण्यात यश मिळवले.
कांदा दरात कोणतीही अवास्तव वाढ झालेली नसतांना केंद्र शासनाकडुन तातडीने अन्यायकारक निर्णय घेऊन निर्यात बंद करण्यात आली. कांद्यासह इतर भाजीपाला शेतीमालांना देखील बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी संपूर्णतः हवालदिल झालेला आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्याचप्रमाणात इतर राज्यात देखील मोठ्याप्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे देशाची कांद्याची मागणी पूर्ण होवून मोठ्याप्रमाणात कांदा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने निर्यात बंदी करुन कांदा दरात घसरण होईल, असे शेतकरीविरोधी निर्णय घेवू नये.
वरीलप्रमाणे शेतकरी वर्गाकडुन मागण्या होत असुन शेतकरी बांधवांच्या शेतीमालास उत्पादन आधारीत बाजारभाव मिळत नसल्याने उद्भवलेल्या परिस्थितीबाबत व शेतक-यांच्या वाढत्या उद्रेकामुळे शासन स्तरावरुन उपरोक्त मागण्यांबाबत तातडीने दखल घेऊन कांदा शेतीमालावर लादलेला अन्यायकारक निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा असे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. सदर आंदोलनाच्या वेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन दादा आहेर प्रहार चे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर मार्केट कमिटीचे चेअरमन संजय जाधव यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांसह मालेगाव धुळे चाळीसगाव या ठिकाणाहून आलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा सदर आंदोलनात भाग घेऊन आक्रमकता दाखवली.
सदर आंदोलन स्थळी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पीएसआय सुरेश चौधरी, पीएसआय भाऊसाहेब नऱ्हे तुमचे सह चांदवड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी तसे मनमाड पोलीस विभागीय कार्यालयाचे दंगा नियंत्रण पथक यांनी योग्य बंदोबस्त ठेवून सदर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!